तेलंगणात उभारणार रेल कोच कारखाना, २०० एकर जागेवर उभारला जाणार प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:45 AM2017-10-23T04:45:26+5:302017-10-23T04:45:39+5:30

रेल कोच कारखाना स्थापन करण्यासाठी तेलंगणा सरकार लवकरच उद्योग संघासोबत समझोता करार करणार आहे, असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

Rail Coach Factory, set up in Telangana, will be set up at 200 acres | तेलंगणात उभारणार रेल कोच कारखाना, २०० एकर जागेवर उभारला जाणार प्रकल्प

तेलंगणात उभारणार रेल कोच कारखाना, २०० एकर जागेवर उभारला जाणार प्रकल्प

Next

हैदराबाद : रेल कोच कारखाना स्थापन करण्यासाठी तेलंगणा सरकार लवकरच उद्योग संघासोबत समझोता करार करणार आहे, असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. तथापि, त्यांनी या संदर्भात अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. विधानसभेचे अधिवेशन २७ आॅक्टोबरपासून सुरू होत असल्याने, करारावर स्वाक्षरी करण्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. कारण या क्षेत्रात आद्यप्रवर्तक असलेल्या काही उद्योगांसमवेत या संदर्भात करार करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. कराराची तारीख अद्याप ठरविण्यात आलेली नाही. बहुधा पुढच्या आठवड्यात करार होईल. विधानसभा अधिवेशनाच्या वेळापत्रकावर हे अवलंबून आहे, असे या अधिकाºयाने सांगितले. काझीपेठ येथे रेल कोच कारखाना उभारण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले असले, तरी मूर्त स्वरूपात या अनुषंगाने कोणतीही प्रगती झालेली नाही. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाºयांशी या मुद्द्यावर संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले
की, या कारखान्यासाठी जमीन निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारने मात्र रेल्वेकडे जमीन हस्तांतरित केलेली नाही. 200 एकर जागेत हा कारखाना उभारला जाणार आहे. अलीकडेच रेल्वेच्या अधिकाºयांची उपमुख्यमंत्री कदियाम श्रीहरी यांच्यासोबत या मुद्द्यांवर चर्चाही झाली आहे. जमीन हस्तांतरित झाल्यानंतरच पुढची कार्यवाही सुरू करता येईल, असे रेल्वेच्या अधिकाºयाने सांगितले. कारखान्याचे ठिकाण, किती गुंतवणूक होणार यासह इतर तपशील करार स्वाक्षरी करतेवेळी घोषित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Rail Coach Factory, set up in Telangana, will be set up at 200 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.