मसूद प्रकरणावर राहुल भडकले, म्हणे, जिनपिंगना मोदी घाबरतात, आता गप्प का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:51 AM2019-03-14T11:51:13+5:302019-03-14T12:08:03+5:30

 मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्तावावर चीननं नकाराधिकारा(विटोचा)चा वापर केल्यानंतर भारतातल्या राजकीय हालचाली वाढल्या आहे.

rahul gandhi slams narendra modi on china? | मसूद प्रकरणावर राहुल भडकले, म्हणे, जिनपिंगना मोदी घाबरतात, आता गप्प का?

मसूद प्रकरणावर राहुल भडकले, म्हणे, जिनपिंगना मोदी घाबरतात, आता गप्प का?

Next

नवी दिल्ली-  मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्तावावर चीननं नकाराधिकारा(विटोचा)चा वापर केल्यानंतर भारतातल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारताला हा मोठा धक्का बसला असतानाच विरोधकांनीही या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगना घाबरतात. चीन जेव्हा जेव्हा भारताविरोधात एखादा निर्णय घेतो, त्यावेळी मोदी काहीही बोलत नाहीत.

राहुल गांधींनी मोदींच्या चीन धोरणावरही सडकून टीका केली आहे. मोदी शी जिनपिंग यांच्याबरोबर झोके घेतात, दिल्लीत त्यांची गळाभेट घेतात, चीनमध्येही त्यांच्यासमोर झुकतात, असं म्हणत राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रक्रियेमध्ये चीननं नकाराधिकाराचा वापर केल्यानंतर काँग्रेसनं मोदींना धारेवर धरलं आहे. मोदींनी परराष्ट्र नीती म्हणजे 'कूटनीतीला अपवाद' असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला यांनी ट्विट करत चीन आणि पाकिस्तानवर टीका केली आहे.


दहशतवादाविरोधात जागतिक लढाईतला हा दुःखद दिवस आहे. दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानच्या बरोबर चीन असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असंही सुरजेवाला म्हणाले आहेत.  मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र चीननंनकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे.
पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर अजहरची एक ऑडियो टेप समोर आली होती. यात भाचा उस्मानच्या हत्येचा बदला घेण्याची सूचना त्यानं दहशतवाद्यांना केली होती. मात्र चीननं संयुक्त राष्ट्रात जैश आणि अजहरचा संबंध नसल्याचा दावा केला. मसूदच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असाही दावा चीनकडून करण्यात आला. या प्रकरणी भारतानं मसूदच्या ऑडियो टेप संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला दिल्या. जैश आणि मसूदचे संबंध यामधून स्पष्ट होत होते. 

Web Title: rahul gandhi slams narendra modi on china?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.