रवींद्र गायकवाडांमुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत

By admin | Published: March 25, 2017 12:07 AM2017-03-25T00:07:34+5:302017-03-25T00:07:34+5:30

शिवसेना खा. रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण व विमान कंपन्यांनी त्यांच्यावर घातलेली बंदी

Rabindra Gaikwad's turn to the ruling party | रवींद्र गायकवाडांमुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत

रवींद्र गायकवाडांमुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत

Next

हरीश गुप्ता / नवी दिल्ली
शिवसेना खा. रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण व विमान कंपन्यांनी त्यांच्यावर घातलेली बंदी याबाबत विविध मते व्यक्त होत असली, तरी ही बंदी टिकून राहू शकत नाही, असे दिसते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी कडक भूमिका घेण्याची शक्यता आहे.
नागरी विमान वाहतूकमंत्री ए. गणपती राजू आणि जयंत सिन्हा यांनी अतिशय सावध भाष्य केले आहे. राजू यांनी टिष्ट्वट केले आहे की, बेलगाम प्रवासी आणि अनिष्ट वर्तन यांना आळा घालण्यासाठी आम्ही संस्थात्मक यंत्रणा उभारत आहोत. जयंत सिन्हा म्हणाले की, ‘कोणीही याचे समर्थन करू शकत नाही. या खासदाराने जी तक्रार केली, त्याची एअर इंडियाही चौकशी करत आहे. मंत्रालयही तपास करेल. हे प्रकरण लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासमोर येऊ शकते. मात्र, त्यासाठी सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेण्याच्या विशेषाधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. अशी तक्रार करणे गरजेचे आहे. आतापर्यंत अशी तक्रार दाखल झालेली नाही.’

Web Title: Rabindra Gaikwad's turn to the ruling party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.