पेट्रोलमध्ये ३ टक्के मेथेनॉल मिश्रणाचा प्रस्ताव

By admin | Published: March 27, 2017 01:27 AM2017-03-27T01:27:33+5:302017-03-27T01:27:33+5:30

पेट्रोलमध्ये ३ टक्के मेथेनॉल मिश्रणाचा प्रस्ताव नीती आयोगाने दिला आहे. आयात होणाऱ्या

Propose 3 percent of methanol mixture in petrol | पेट्रोलमध्ये ३ टक्के मेथेनॉल मिश्रणाचा प्रस्ताव

पेट्रोलमध्ये ३ टक्के मेथेनॉल मिश्रणाचा प्रस्ताव

Next

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये ३ टक्के मेथेनॉल मिश्रणाचा प्रस्ताव नीती आयोगाने दिला आहे. आयात होणाऱ्या इंधनावरील खर्च कमी करण्याचा यामागचा प्रयत्न आहे. नीती आयोगाने याबाबत एका कॅबिनेट नोटचा मसुदा तयार केला.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, नीती आयोगाच्या एका समितीने मेथेनॉल मिश्रित पेट्रोलवर एक कॅबिनेट नोटचा मसुदा तयार केला आहे. विचारविनिमयासाठी तो परिवहन मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. आयोगाने पेट्रोलमध्ये ३ टक्के मेथेनॉल मिश्रणाचा प्रस्ताव दिला आहे. चीनसारखे देश मेथेनॉल मिश्रणाचा यशस्वी वापर करत आहेत. गतवर्षी नीती आयोगाचे सदस्य आणि मेथेनॉल समितीचे अध्यक्ष व्ही. के. सारस्वत यांनी म्हटले होते की, भारताची पेट्रोल आयात कमी करण्यात आणि त्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला मदत करण्यात मेथेनॉलची भूमिका महत्वाची राहणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या कमी करण्यातही यामुळे मदत होणार आहे.

Web Title: Propose 3 percent of methanol mixture in petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.