'रेल्वेमध्ये नोकर भरतीची घोषणा म्हणजे मोदी सरकारचा आणखी एक जुमला'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 11:17 AM2019-01-24T11:17:52+5:302019-01-24T11:28:46+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

promise of 4 lakh railway recruit is another jumla Says p chidambaram | 'रेल्वेमध्ये नोकर भरतीची घोषणा म्हणजे मोदी सरकारचा आणखी एक जुमला'

'रेल्वेमध्ये नोकर भरतीची घोषणा म्हणजे मोदी सरकारचा आणखी एक जुमला'

ठळक मुद्देभारतीय रेल्वे सेवेमध्ये 4 लाख पदांची भरती मोदी सरकारने केलेली घोषणा म्हणजे आणखी एक जुमला - चिदंबरम

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भारतीय रेल्वे सेवेमध्ये येत्या दोन वर्षांमध्ये एकूण चार लाख पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी (23 जानेवारी) दिली. पियुष गोयल यांनी केलेली ही नोकरभरतीची घोषणा म्हणजे 'आणखी एक जुमला' असल्याची टीका चिदंबरम यांनी केली आहे. पाच वर्ष शांत बसलेल्या या सरकारला अचानक रिक्तपदं भरण्यासाठी आता जाग आली, असा खोचक टोलादेखील चिदंबरम यांनी हाणला आहे. चिदंबरम यांनी गुरुवारी (24 जानेवारी) मोदी सरकारवर ट्विटरवरुन शाब्दिक हल्ला चढवला.

''रेल्वेमध्ये जवळपास पाच वर्षांपासून 2,82,976 पदं रिक्त आहेत. सरकार आता अचानक झोपेतून जागे झाले आहे. तीन महिन्यांमध्ये या रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. हा आणखी एक जुमला आहे, असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे.

''कित्येक सरकारी विभागांमध्ये हीच परिस्थिती आहे. एकीकडे सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत आणि दुसरीकडे तरुणवर्ग बेरोजगार आहे'', असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 


दरम्यान, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी भारतीय रेल्वे सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरी भरती करणार असल्याची घोषणा बुधवारी केली होती. भारतीय रेल्वेत सध्या एक लाख 32 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. येत्या दोन वर्षामध्ये एक लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या दोन वर्षात एकूण 4 लाख पदांची नोकर भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री गोयल यांनी दिली. 



 

 

Web Title: promise of 4 lakh railway recruit is another jumla Says p chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.