लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा 2.0 मध्ये दिसणार प्रियांका गांधी, राहुल गांधींसाठी खास प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 11:26 AM2023-12-25T11:26:18+5:302023-12-25T11:27:59+5:30

पहिल्या टप्प्यात सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत, अर्थात जवळपास 150 दिवस राहुल गांधी यांनी पदयात्रा केली होती. 

Priyanka Gandhi to appear in bharat jodo yatra 2.0 with rahul gandhi ahead of Lok Sabha elections 2024 special plan for Rahul Gandhi | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा 2.0 मध्ये दिसणार प्रियांका गांधी, राहुल गांधींसाठी खास प्लॅन?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा 2.0 मध्ये दिसणार प्रियांका गांधी, राहुल गांधींसाठी खास प्लॅन?

उत्तर प्रदेश प्रभारी पदावरून मुक्त केल्यानंतर, आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पदयात्रेमध्ये दिसू शकतात. भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला जानेवारी 2024 मध्ये सुरुवात होत आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे काढण्यात येणाऱ्या या यात्रेत राहुल आणि प्रियांका गांधी हे दोघेही रस्त्यावर दिसू शकतात. टीओआय ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मोठा प्रस्ताव असा आहे की राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या योत्रेत सोबत चालावे. या संदर्भात रणनीती आखणाऱ्या मंडळींनी यासंदर्भात विचारही केला आहे. पहिल्या टप्प्यात सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत, अर्थात जवळपास 150 दिवस राहुल गांधी यांनी पदयात्रा केली होती. 

यासंदर्भात बोलताना काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याने म्हटले आहे की, या संपूर्ण यात्रेदरम्यान या भाऊ-बहिणीने एकत्रीतपणे सहभागी होण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. अनेक गोष्टींवर विचार करावा लागणार आहे. कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राहुल गांधी तर नेते आहेतच. मात्र प्रियांका गांधी यांची महिला, तरुण वर्ग आणि ग्रामीण भागांतील लोकांमध्ये चांगली क्रेझ आहे, असे काँग्रेसचे मत आहे. महत्वाचे म्हणजे, दक्षिणेकडून उत्तरेकडे काढण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील पदयात्रेतही, काही ठिकाणी प्रियांका गांधी राहुल गांधींसोबत दिसून आल्या होत्या. 

यावेळची यात्रा हायब्रिड मोडमध्ये असेल - 
नुकतेच काँग्रेस वर्किंग कमिटीने राहुल गांधी यांना यात्रा 2.0 काढावी असे म्हटले होते. मात्र, लोकसभा निवडणुका लक्षात घेत पुन्हा एकदा 4-5 महिने रस्त्यावर घालवीणे काचित योग्य ठरणार नाही, असेही पक्षाला वाटते. यामुळे काँग्रेस या यात्रेला हायब्रीड यात्रेचे स्वरूपही देऊ शकते. ही यात्रा काही शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये पाई चालेल. तर उर्वरित यात्रा वाहनांतून पूर्ण केली जाईल.

सूत्रांचे म्हणणे आहे की, राहुल गांधींसोबत प्रियंका गांधी असल्यास, माजी काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक कार्यक्रमांसाठी सहजपणे वेळ काढता येईल, हा सर्वात मोठा फायदा असेल. 

Web Title: Priyanka Gandhi to appear in bharat jodo yatra 2.0 with rahul gandhi ahead of Lok Sabha elections 2024 special plan for Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.