प्रियंका गांधी बनणार सरचिटणीस?

By admin | Published: March 2, 2015 02:47 AM2015-03-02T02:47:02+5:302015-03-02T02:47:02+5:30

संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी वड्रा यांची काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी केली जाऊ शकते,

Priyanka Gandhi becoming general secretary? | प्रियंका गांधी बनणार सरचिटणीस?

प्रियंका गांधी बनणार सरचिटणीस?

Next

नवी दिल्ली : संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी वड्रा यांची काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. लोकसभा व त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे हताश झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रियंका यांच्या या नियुक्तीमुळे नवचैतन्य निर्माण होईल, असे मानले जाते.
प्रियंका यांना काँग्रेसचा अविभाज्य भाग बनवून सक्रिय राजकारणात आणण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे मागील तीन महिन्यांपासून जोरदार प्रयत्न करीत आहेत. राहुल यांच्या या प्रयत्नांना आता यश मिळत आहे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे हे मत विचारात घेतले आहे, अशी माहिती या सूत्रांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राहुल गांधी अचानक म्यानमारमध्ये सुटीवर गेल्यावरून निर्माण झालेला वाद व राहुल गांधी यांना बढती देऊन पक्षाध्यक्ष बनविण्याच्या होत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा संभाव्य बदल लक्षणीय आहे. राहुल गांधी आता अधिक जोमाने आणि बळकट बनून परततील, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी म्हटले आहे.

Web Title: Priyanka Gandhi becoming general secretary?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.