पंतप्रधान मोदींबद्दल आदर उरला नाही - राम जेठमलानीं

By admin | Published: June 9, 2015 10:50 AM2015-06-09T10:50:04+5:302015-06-09T10:56:56+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आता माझ्या मनात आदर उरला नाही, असे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी म्हटले आहे. 'तसेच मी पंतप्रधानांशी संबंध तोडत आहे' असेही त्यांनी जाहीर केले.

Prime Minister Modi is not respected - Ram Jethmalani | पंतप्रधान मोदींबद्दल आदर उरला नाही - राम जेठमलानीं

पंतप्रधान मोदींबद्दल आदर उरला नाही - राम जेठमलानीं

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आता माझ्या मनात आदर उरला नाही, असे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी म्हटले आहे. 'तसेच मी पंतप्रधानांशी संबंध तोडत आहे' असेही त्यांनी  जाहीर केले.

के. व्ही. चौधरी यांची केंद्रिय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) आयुक्तपदी निवड झाल्यावर जेठमलानी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहीन आपली नाराजी व्यक्त केली असून त्यात आपल्याबद्दल आदर उरला नाही असे नमूद करण्यात आले आहे. 'दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी बसण्याची चौधरी यांची पात्रता नाही. आता मी हा लढा सर्वोच्च न्यायालय व जनतेच्या वतीने लढणार आहे' असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केल्यावर जेठमलानी यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता तेच जेठमलानी मोदींना विरोध करताना दिसत आहेत. 

एका आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या समितीने चौधरींच्या नावाला संमती दिली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कम मंडळाचे माजी प्रमुख चौधरी यांची सीव्हीसीपदी झालेली नियुक्ती पंरपरेला छेद देणारी आहे. आजवर आयएएस अधिका-यांचीच यापदी नियुक्ती होत आली आहे.

 

Web Title: Prime Minister Modi is not respected - Ram Jethmalani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.