येत्या 1 एप्रिलपासून 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 09:20 PM2024-03-19T21:20:30+5:302024-03-19T21:20:51+5:30

या औषधांच्या यादीमध्ये पेनकिलर, अँटीबायोटिक आणि अँटी-इन्फेक्शन औषधांचाही समावेश आहे.

Prices of 800 essential medicines will increase from April 1; Know the reason | येत्या 1 एप्रिलपासून 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण..?

येत्या 1 एप्रिलपासून 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण..?

Medicine Price Hike : वाढत्या महागाईत जनतेला आणखी एक झटका बसणार आहे. येत्या 1 एप्रिल 2024 पासून 800 औषधांच्या किमती वाढणार आहेत. या औषधांच्या यादीमध्ये पेनकिलर, अँटीबायोटिक आणि अँटी-इन्फेक्शन औषधांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने होलसेल प्राइस इंडेक्‍समध्ये (WPI) अनेक बदल केले आहेत. तसेच, सरकार राष्ट्रीय आवश्यक औषध यादीमध्ये (NLEM) 0.0055 टक्क्यांची वाढ करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून औषध कंपन्यांकडून वाढत्या महागाईमुळे दर वाढवण्याची मागणी होत आहे.

यापूर्वी 12% आणि 10% वाढ झाली

यापूर्वी 2022 मध्ये औषधांच्या किमतीत 12 टक्के आणि 10 टक्क्यांनी वाढ झाली होती. रिपोर्टनुसार, वर्षातून एकदा औषधांच्या किमतीत वाढ करण्यास मान्यता दिली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांत औषधात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीत 15 ते 130 टक्के वाढ झाली आहे. पॅरासिटामॉल 130 टक्क्यांनी वाढली आहे, तर एक्सीसिएंट्सच्या किमती 18-262 टक्क्यांनी वाढल्या आहेत. इतर अनेक औषधांच्या किमती वाढल्या आहेत.

आवश्यक औषधे काय आहेत?
ज्या औषधांचा बहुतांश लोक नियमित वापर करतात, त्यांचा या यादीत समावेश होतो. या औषधांच्या किमती सरकारच्या नियंत्रणात असतात. कंपन्या या औषधांच्या किमती वर्षभरात केवळ 10 टक्के वाढवू शकतात. या यादीत कर्करोगविरोधी औषधांचाही समावेश आहे. अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये पॅरासिटामॉल सारखी औषधे, ॲझिथ्रोमायसिन सारखी अँटीबायोटिक्स, ॲनिमिया औषधे, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी काही औषधे आणि स्टिरॉइड्सदेखील यादीत आहेत. 

किमती का वाढणार?
उद्योग तज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये काही प्रमुख सक्रिय औषधी घटकांच्या किमती 15% ते 130% च्या दरम्यान वाढल्या आहेत. पॅरासिटामॉलच्या किमतीत 130% आणि एक्सिपियंट्सच्या किमती 18-262% ने वाढल्या आहेत. ग्लिसरीन आणि प्रोपीलीन ग्लायकॉलसह सॉल्व्हेंट्स, सिरप अनुक्रमे 263% आणि 83% ने महाग झाले आहेत. इंटरमीडिएट्सच्या किमतीही 11% ते 175% च्या दरम्यान वाढल्या आहेत. पेनिसिलिनदेखील 175% महाग झाली आहे. त्यामुळेच एक हजारहून अधिक भारतीय औषध उत्पादकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या  गटानेही सरकारला सर्व विहित फॉर्म्युलेशनच्या किमतींमध्ये 10% वाढ करण्यास त्वरित प्रभावाने परवानगी देण्याची विनंती केली होती. तसेच नॉन शेड्यूल औषधांच्या किमतीत 20% वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Prices of 800 essential medicines will increase from April 1; Know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.