दिल्लीत राष्ट्रपती राजवट?; केंद्र सरकारकडून तयारी सुरू असल्याचा आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:03 AM2024-04-13T06:03:26+5:302024-04-13T06:03:44+5:30

गृहमंत्रालयाला विनाकारण उपराज्यपालांची पत्रे

President's Rule in Delhi?; You allege that the central government is preparing | दिल्लीत राष्ट्रपती राजवट?; केंद्र सरकारकडून तयारी सुरू असल्याचा आपचा आरोप

दिल्लीत राष्ट्रपती राजवट?; केंद्र सरकारकडून तयारी सुरू असल्याचा आपचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्याचे निमित्त साधून केंद्रातील भाजप सरकार राष्ट्रपती राजवट लावण्याच्या तयारीत असल्याची शंका ‘आम आदमी पार्टी’ सरकारचे मंत्री आणि नेते व्यक्त करीत आहेत.

केजरीवाल सरकारविरोधात मोठे कारस्थान रचले जात असून, येणाऱ्या काही दिवसांत केंद्रातील भाजप सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती असल्याचा आरोप दिल्लीच्या अर्थ तसेच शिक्षणमंत्री आतिशी सिंह यांनी केला. सरकारच्या कामकाजाविषयी कारण नसताना उपराज्यपाल सक्सेना गृह मंत्रालयाला पत्रे लिहीत आहेत. अधिकारी बैठकींना येत नाहीयेत.  या घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चाललेल्या वाटचालीच्या निदर्शक असल्याचा दावा आतिशी सिंह यांनी केला.

पक्षप्रचारासाठी सिसोदिया यांना हवा जामीन
nगेल्या चौदा महिन्यांपासून मद्य धोरण घोटाळ्यात तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी अंतरिम जामिनासाठी राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 
nसिसोदिया यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने खटले भरले असून, याचिकेवर २० एप्रिल रोजी सुनावणी होईल. 

राज्यसभा खासदार नेमके गेले कुठे? जोरदार चर्चा
पंजाब आणि दिल्ली मिळून आम आदमी पार्टीचे राज्यसभेत १० खासदार आहेत. त्यापैकी नुकतेच तिहार तुरुंगातून जामिनावर सुटलेले संजय सिंह वगळता राज्यसभेतील पक्षाचे अन्य खासदार केजरीवाल यांच्या अटकेनंतर फारसे दिसलेले नाहीत. 
त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, ‘आप’चे राज्यसभा सदस्य पूर्वीही पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत नव्हते, असे सांगून त्यांच्या संबंधात सुरू असलेल्या अटकळी सौरभ भारद्वाज यांनी फेटाळून लावल्या.

....म्हणून त्यांची अस्वस्थता वाढली
कितीही जोर लावला तरीही दिल्लीत निवडणूक जिंकून सत्तेत येऊ शकत नाही, हे भाजपच्या लक्षात आले आहे. वीज, पाणी, शाळा, आरोग्य सुविधा, महिलांना मोफत वाहतूक तसेच दिल्लीतील महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घोषणेमुळे भाजपची अस्वस्थता वाढली आहे. 
या सर्व योजना रोखण्यासाठी  सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. ‘आप’ने बहुमत सिद्ध केल्यामुळे राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
 

Web Title: President's Rule in Delhi?; You allege that the central government is preparing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.