मोदींविरोधात तोगडिया रिंगणात; उत्तर प्रदेशमध्ये 26 उमेदवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 04:20 PM2019-03-26T16:20:10+5:302019-03-26T16:21:08+5:30

विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष तोगडिया यांनी आज 26 उमेदवार जाहीर केले.

Pravin Togadia will fight against Narendra Modi; 26 candidates announced in Uttar Pradesh | मोदींविरोधात तोगडिया रिंगणात; उत्तर प्रदेशमध्ये 26 उमेदवारांची घोषणा

मोदींविरोधात तोगडिया रिंगणात; उत्तर प्रदेशमध्ये 26 उमेदवारांची घोषणा

googlenewsNext

लखनऊ : विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवार घोषित केले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा पक्ष  'हिंदुस्थान निर्माण दल' 26 जागा लढविणार आहे. तोगडिया स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून लढणार आहेत. 


विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष तोगडिया यांनी आज 26 उमेदवार जाहीर केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मार्गदर्शकचे मूकदर्शक बनविल्याचा आरोप त्यांनी मोदींवर केला. तसेच देशाची आर्थिक धोरणे उद्योगपती घराण्यांसाठी बनविल्याची गंभीर टीकाही त्यांनी केली. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पाच वर्षांत कधीही अयोध्येला गेले नाहीत. त्यांना रामापासून भीती वाटतेय का, असा सवाल करत त्यांनी मोदींचा राष्ट्रवाद हा निवडणुकीपुरता आहे. राम तर त्यांना केवळ निवडणूक आली कीच आठवतात, असा आरोपही केला. 


त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 52 महिन्यांत हजाराहून अधिक सैनिक शहीद झाले आहेत. दर दिवशी जवान शहीद होत आहेत. ही चिंतेची बाब आहे. देशभक्ती राष्ट्रवादापेक्षा मोठी असते. भाजपाचे काँग्रेसीकरण झाले आहे. आम्ही सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना कंटाळून नवीन पक्ष बनविला आहे, असे तोगडिया म्हणाले. 

Web Title: Pravin Togadia will fight against Narendra Modi; 26 candidates announced in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.