शेकडो मतदानयंत्रांचा पोस्टाने ‘अर्जंट’ बटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:04 AM2018-09-19T00:04:38+5:302018-09-19T06:57:47+5:30

पार्सले कुठे व कोणाला पाठविली, हे गुलदस्त्यात आहे

Post 'poll' for hundreds of polling booths | शेकडो मतदानयंत्रांचा पोस्टाने ‘अर्जंट’ बटवडा

शेकडो मतदानयंत्रांचा पोस्टाने ‘अर्जंट’ बटवडा

googlenewsNext

मुंबई : बंगळुरूच्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.’ (बीईएल) या सरकारी कंपनीने काही वर्षांत शेकडो मतदानयंत्रांचा टपालाने व हस्तपोच पद्धतीने पुरवठा केल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. मात्र ही पार्सले कुठे व कोणाला पाठविली, हे गुलदस्त्यात आहे. मतदानयंत्रांचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या दोन सरकारी कंपन्यांपैकी ‘बीईएल’ एक आहे.

मुंबईतील ‘आरटीआय’ कार्यकर्ते मनोरंजन एस. रॉय यांनी माहिती अधिकारात केलेल्या अर्जांच्या उत्तरात ‘बीईएल’ने ही माहिती दिली आहे. मतदानयंत्रांचे उत्पादन व त्यांचा पुरवठा याविषयीच्या आकडेवारीत घोळ असल्याचा मुद्दा घेऊन रॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी होणाºया सुनावणीत ही माहिती सादर होण्याची शक्यता आहे.

रॉय म्हणाले की, मतदानयंत्रांची ८२० ‘बॅलेट युनिट्स’ १९ फेब्रुवारी २०१४ रोजी ‘बल्क पॅकेजिंग’ने पाठविल्याचे ‘बीईएल’ ने कळविले. कंपनीच्या म्हणण्यानुसार एप्रिल २०१७ मध्ये दोनदा मिळून २४५ ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे हस्तपोच केली. एवढ्या मोठ्या संख्येने ‘बॅलेट युनिट््स’ टपालाने कुठे व कोणाला पाठविली व ती संबंधितांना मिळाली का, याचा उल्लेख कंपनीच्या उत्तरात नाही. कंपनीने ८२० ‘बॅलेट युनिट््स’ टपालाने पाठविली, त्याचे नऊ ‘डॉकेट नंबर’ दिले आहेत. त्यावरून नऊ खोक्यांमध्ये यंत्रे भरली होती असे दिसते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ६ व १० एप्रिल २०१७ रोजी अनुक्रमे ६५, ७० व ११० ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे तीन पार्सलमधून हस्तपोच केली.

Web Title: Post 'poll' for hundreds of polling booths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.