आत्महत्या करण्यापूर्वी भय्यू महाराजांनी पत्नीला दिलं होतं खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 12:10 PM2018-06-20T12:10:49+5:302018-06-20T12:10:49+5:30

भय्यू महाराजांच्या आत्महत्येचा तपास सुरू

police investigate about clues in alleged suicide case of god man bhaiyyu maharaj | आत्महत्या करण्यापूर्वी भय्यू महाराजांनी पत्नीला दिलं होतं खास गिफ्ट

आत्महत्या करण्यापूर्वी भय्यू महाराजांनी पत्नीला दिलं होतं खास गिफ्ट

Next

इंदूर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांच्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आर्थिक समस्यांना कंटाळून जीवन संपवत असल्याचं भय्यू महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं होतं. या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस भय्यू महाराज आणि दुसऱ्या पत्नीशी त्यांचे असलेले संबंध यांचाही तपास करत आहेत. भय्यू महाराज यांनी 2017 मध्ये आयुषी शर्मा यांच्यासोबत विवाह केला होता. 

कायम पांढऱ्याशुभ्र रंगाचे कपडे परिधान करणाऱ्या भय्यू महाराजांना केशरी रंग अतिशय आवडायचा. ज्या दिवशी (12 जून) भय्यू महाराजांनी आत्महत्या केली, त्याच दिवशी त्यांनी केशरी रंगाची साडी आयुषी शर्मा यांना दिली होती. आयुषी तीच साडी नेसून पदवी घेण्यासाठी विद्यापीठात गेल्या होत्या. महाराष्ट्राच्या रहिवासी असणाऱ्या आयुषी मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी इंदूरला गेल्या होत्या. त्यांची आणि भय्यू महाराजांची ओळख अण्णा हजारेंच्या आंदोलनादरम्यान झाली. आयुषी यांच्या वडिलांना पाच भाऊ आहेत. हे सर्व भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत. शिक्षण पूर्ण केल्यावर आयुषी यांनी भय्यू महाराजांच्या आश्रमात सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम सुरू केलं.

आयुषी दिवसातील पाच तास भय्यू महाराजांच्या आईसोबत घालवायच्या. हा त्यांच्या कामाचा भाग होता. हळूहळू आयुषी यांचा भय्यू महाराजांच्या बहिणीशी चांगला परिचय झाला. आयुषी त्यांना अक्का म्हणायची. यानंतर दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला. अक्का यांनी भय्यू आयुषी यांना भय्यू महाराजांशी लग्न करण्याबद्दल विचारणा केली होती. आयुषी यांना या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही वेळ मागितला. यानंतर त्यांनी लग्नाला होकार दिला आणि 2017 मध्ये आयुषी आणि भय्यू महाराज विवाहबंधनात अडकले.
 

Web Title: police investigate about clues in alleged suicide case of god man bhaiyyu maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.