1988 मध्ये ई-मेल, डिजिटल कॅमेऱ्याचा वापर; जाणून घ्या मोदींच्या दाव्यात किती तथ्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 05:09 PM2019-05-13T17:09:39+5:302019-05-13T17:13:15+5:30

देशात इंटरनेट, डिजिटल कॅमेरा कधी आला याची सोशल मीडियावर चर्चा

pm narendra modi says he used email and digital camera in 1988 know the truth | 1988 मध्ये ई-मेल, डिजिटल कॅमेऱ्याचा वापर; जाणून घ्या मोदींच्या दाव्यात किती तथ्य?

1988 मध्ये ई-मेल, डिजिटल कॅमेऱ्याचा वापर; जाणून घ्या मोदींच्या दाव्यात किती तथ्य?

Next

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीइंटरनेट आणि ई-मेलबद्दल केलेल्या दाव्यांनंतर आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. 1988 मध्ये डिजिटल कॅमेरा आणि ई-मेलचा वापर केल्याचा दावा मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. मोदींचा हा दावा कितपत खरा यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. देशात इंटरनेट सेवा केव्हा सुरू झाली, डिजिटल कॅमेरा केव्हा उपलब्ध झाला, याबद्दल अनेकजण इंटरनेटवर सर्च करत आहेत. 

जगातला पहिला मेल 1971 मध्ये अमेरिकेतल्या केम्ब्रिजमध्ये राहणाऱ्या रे टॉमलिंसन नावाच्या व्यक्तीनं पाठवला. टॉमलिंसन यांच्या घरातल्या एकाच खोलीत दोन कॉम्प्युटर होते. त्यांनी एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये मेल पाठवला. हे दोन्ही कॉम्प्युटर नेटवर्क अर्पानेटनं (Advanced Research Projects Agency Network) जोडले गेले होते. ही इंटरनेटची सुरुवात होती. आधुनिक इंटरनेट सेवेचा जन्म 1983 मध्ये झाला. भारतात इंटरनेट सेवा 1995 मध्ये सुरू झाली. विदेश संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून ही सेवा दिली जात होती. 

1988 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केल्याचं मोदी मुलाखतीत म्हणाले. 'मी बहुधा 1988 मध्ये पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा वापरला,' असं मोदींनी मुलाखतीत म्हटलं. कोडॅकमध्ये इंजिनीयर असेलल्या स्टिव्हन सॅसन यांनी 1975 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा शोध लावला. व्यावसायिक तत्त्वावरील पहिला कॅमेरा अमेरिकेत 1988 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला. त्यानंतर तो भारतात आला. कॅमेरा आणि फोटोग्राफी क्षेत्रातली त्यावेळची आघाडीची कंपनी कोडॅककडे डिजिटल कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान होतं. मात्र डिजिटल कॅमेरा बाजारात आणल्यास फोटोग्राफीसाठी वापरले जाणाऱ्या रोल्सच्या विक्रीवर परिणाम होईल, असा विचार करून कंपनीनं डिजिटल कॅमेरा बाजारात आणला नाही.

Web Title: pm narendra modi says he used email and digital camera in 1988 know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.