पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-चीन सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 08:26 AM2018-11-07T08:26:11+5:302018-11-07T08:28:18+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही आपल्या खास अंदाजात दिवाळी साजरी करणार आहेत.

pm narendra modi diwali celebration uttarakhand china border kedarnath | पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-चीन सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-चीन सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही आपल्या खास अंदाजात दिवाळी साजरी करणार आहेत. 2014मध्ये पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यापासून मोदी देशाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यंदा ते उत्तराखंडातील हर्षिल बॉर्डरवर जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळेस त्यांच्यासोबत लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि सैन्याचे अन्य अधिकारीदेखील हजर असतील. हर्षिल बॉर्डर हे भारत-चीन सीमारेषेपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी बाबा केदारनाथाचेही दर्शन घेणार आहेत. 

2014मध्ये पंतप्रधान मोदींनी LoCवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ जाऊन त्यांनी बीएसएफच्या जवानांसोबत दिवाळीचा आनंद लुटला. जवानांच्या शौर्यालाही त्यांनी सलाम केले होते.  




Web Title: pm narendra modi diwali celebration uttarakhand china border kedarnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.