पाकिस्तानातून आलेल्या विमानाने उडाली खळबळ

By admin | Published: July 14, 2014 12:49 AM2014-07-14T00:49:38+5:302014-07-14T00:49:38+5:30

पाकच्या दिशेकडून भारतीय हद्दीत घुसलेल्या दोन व्यावसायिक विमानांनी एकाच विमान ओळख संकेताचा वापर केल्यामुळे रविवारी एकच खळबळ उडाली

The plane was flown by a plane from Pakistan | पाकिस्तानातून आलेल्या विमानाने उडाली खळबळ

पाकिस्तानातून आलेल्या विमानाने उडाली खळबळ

Next

जोधपूर : पाकच्या दिशेकडून भारतीय हद्दीत घुसलेल्या दोन व्यावसायिक विमानांनी एकाच विमान ओळख संकेताचा वापर केल्यामुळे रविवारी एकच खळबळ उडाली. पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याचे मानून सुरक्षा संस्थांनी अलर्ट जारी केला एवढेच नव्हे तर मिग-२१ लढाऊ विमान जोधपूरला पाठवत आणीबाणीसाठी सज्जता केली होती.
नंतर ते विमान टर्किश एअरलाइन्सचे असल्याचे आणि त्याने याआधी दाखल झालेल्याच एका विमानाचा कोड वापरल्याचे उघडकीस आले. वायुदलाच्या लढाऊ विमानांनी दुजोरा दिल्यानंतरच जैसलमेरला उतरलेल्या या तुर्की विमानाला पुढे दिल्लीला जाण्याला परवानगी मिळाली. तुर्कस्तानचे हे विमान पाकिस्तानातून भारतात आले होते. जोधपूर हे दिल्लीहून किमान ६०० तर जैसलमेर २८० कि.मी. दूर आहे.
लष्कराचे विमान जैसलमेरला जोधपूरजवळ वायुदलाच्या रडारवर तुर्की विमान दिसल्यानंतर समान कोडमुळे गोंधळ उडताच सदर विमानाला रोखण्यासाठी लष्कराने मिग-२१ बायसन विमान पाठविले. विश्वासार्हता पटविण्यात आल्यानंतरच तुर्की विमानाला जाऊ देण्यात आले. प्रमाणित प्रक्रियेनुसार भारतीय वायुदलाने केवळ लढाऊ जहाजच पाठविले नाही तर वायुदलाच्या संरक्षण विभागालाही सतर्क केले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: The plane was flown by a plane from Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.