गाडीवर २ टक्के अधिभार भरा व टोलमुक्त प्रवास करा, गडकरींचा मास्टरप्लॅन ?

By admin | Published: December 22, 2014 12:13 PM2014-12-22T12:13:50+5:302014-12-22T12:18:28+5:30

टोलवसुलीवरुन देशभरात नाराजीचे वातावरण असतानाच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमुक्त राष्ट्रीय महामार्गांसाठी पुढाकार घेतला आहे.

Pay 2 percent surcharge on the car and travel toll free, Gadkari's masterplan? | गाडीवर २ टक्के अधिभार भरा व टोलमुक्त प्रवास करा, गडकरींचा मास्टरप्लॅन ?

गाडीवर २ टक्के अधिभार भरा व टोलमुक्त प्रवास करा, गडकरींचा मास्टरप्लॅन ?

Next
>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २२ - टोलवसुलीवरुन देशभरात नाराजीचे वातावरण असतानाच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमुक्त राष्ट्रीय महामार्गांसाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी गाडी घेताना दोन टक्के अधिभार घेऊन राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके कायमचे बंद करण्याचा मास्टरप्लॅन नितीन गडकरींनी तयार केल्याचे वृत्त आहे. 
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार वाहूतूक मंत्रालय राष्ट्रीय महामार्गांवरुन धावणा-या बस आणि चार चाकी वाहनांना टोलमुक्त करण्याच्या विचाराधीन आहे. ही तुट भरुन काढण्यासाठी गाडी घेतानाच दोन टक्के जास्त अधिभार वसूल करुन टोलमुक्ती करायची असा प्रस्ताव गडकरींनी तयार केल्याचे समजते. यासोबतच डिझेल व पेट्रोलमध्येही एक रुपया जास्त घेऊन तुटीतील तफावत कमी करण्याचे प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच नितीन गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हा प्रस्ताव सादर करतील अशी चर्चा आहे. 
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत घटल्याने देशभरातील पेट्रोल व डिझेलचे दर घटले आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात एक रुपयानी वाढ केली आणि भविष्यात कच्च्या तेलाची किंमत वाढल्यास याचा फटका जनतेलाच बसेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.  त्यामुळे गडकरींचे टोलमुक्तीचे प्रयत्न कितपत यशस्वी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Pay 2 percent surcharge on the car and travel toll free, Gadkari's masterplan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.