आता 'लेझर'वॉल रोखणार पाकिस्तानची घुसखोरी

By admin | Published: November 27, 2014 10:01 AM2014-11-27T10:01:12+5:302014-11-27T11:35:58+5:30

पाकिस्तानची घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर आता 'लेझर'ची भिंत वापरण्यात येणार आहे.

Pakistan's infiltrators will now stop the 'laser' wall | आता 'लेझर'वॉल रोखणार पाकिस्तानची घुसखोरी

आता 'लेझर'वॉल रोखणार पाकिस्तानची घुसखोरी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - पाकिस्तानला दिलेल्या अनेक इशा-यांनंतरही त्यांची घुसखोरीची कारवाया कायम कायम असून त्यांनी आळा घालण्यासाठी व ही समस्या संपवण्यासाठी  सीमेवर आता 'लेझर'ची भिंत उभारण्याची योजना बीएसएफने (सीमा सुरक्षा दल) आखली आहे. पाकिस्तानला रोखण्यासाठी बीएसएफ अनेक नवीन उपाय पडताळून पाहत असून लेझरच्या या भिंतीमुळे कुंपणरहित भागातूनही कोणी घुसखोरीचा प्रयत्न केल्यास अलार्म वाजेल व भारतीय सैनिकांना सावधानतेचा इशारा मिळेल. या लेझर भिंतीशिवाय बीएसएफ 'भुयारविरोधी सेन्सर' व 'थर्मल सेन्सर' या आधुनिक तंत्रज्ञानाची वापर करण्याच्या विचारात असल्याचे समजते. इस्रायलसह अनेक देशांच्या सीमारेषांवर हे तंत्रज्ञान वापरण्यात येते.
'सीमेवरील नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही आमची शस्त्रास्त्रे व बचावाची साधने सातत्याने अपग्रेड करत आहोत. आम्ही या आधुनिक तंत्रज्ञानाचा सविस्तर अभ्यास केला असून ती आम्हाला वापरासाठी योग्य व उपयोगी वाटत आहेत', असे बीएसएफचे महासंचालक डी. के. पाठक यांनी सांगितले. 
बीएसएफमधील सूत्रांच्या सांगण्यानुसार सीमेवरील काही दुर्गम भागात जेथे तटबंदी वा सुरक्षा तैनात करणे शक्य नसते तेथे लेझरची ही भिंत खूप उपयुक्त ठरू शकेल. ही भिंत कोणीही ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास तर सुरक्षेचा अलार्म वाजेल आणि सैनिकांना इशारा मिळेल. 
मात्र घुसखोरी करताना दहशतवादी भुसुरूंगाचाही वापर करू शकतात, ही गोष्ट लक्षात घेऊन बीएसएफ जमिनीत सेसेमिक सेन्सरही बसवण्याचा विचार करत आहे. जर कोणीही या भागात सुरुंग खोदण्याचा प्रयत्न केला तर जमीन आपोआप हादरायला लागेल व त्याची सूचना कंट्रोल रूमला मिळेल. 
 

Web Title: Pakistan's infiltrators will now stop the 'laser' wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.