पठाणकोट हल्लेखोरांवर पाकिस्तानने कारवाई करावी - अमेरिका

By Admin | Published: January 5, 2016 10:40 AM2016-01-05T10:40:09+5:302016-01-05T10:58:32+5:30

पंजाबच्या पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-यादहशवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई करावी अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे.

Pakistan should take action against Pathankot killers - US | पठाणकोट हल्लेखोरांवर पाकिस्तानने कारवाई करावी - अमेरिका

पठाणकोट हल्लेखोरांवर पाकिस्तानने कारवाई करावी - अमेरिका

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ५ - पंजाबच्या पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-यादहशवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई करावी अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे. शनिवारी पहाटे लष्कराच्या वेषात आलेल्या काही दहशतवाद्यांनी पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर घुसखोरी करून अंदाधुंद गोळीबार करत हल्ला चढवला. त्यात ७ जवान शहीद तर ५० अधिक जण जखमी झाले आहे. 
'युनायटेड जिहाद कौन्सिल' या अतिरेकी संघटनांच्या समूहाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असूव पाकिस्तानतचा हल्ल्याशी काहीच संबंध नसल्याचा दावा केला असला तरी हासर्व भारताला दिशाभूल करण्याचा  प्रयत्न असून या हल्ल्यामागे ' जैश-ए-मोहम्मद'चाच हात असल्याचे मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची पद्धती आणि इतर माहितीवरून हा हल्ला जैश-ए-मोहंमदनेच केल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या सर्व पार्श्वभूमीवर  व भारताने या हल्ल्याबाबत दिलेल्या पुराव्यांवरून पाकिस्तानने हल्लेखोरांवर कारवाई करावी, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बे म्हणाले. याबाबत पाकिस्तान सरकारशी चर्चा झाली असून, ते आमच्या अपेक्षेनुसार संबंधित दहशतवाद्यांवर कारवाई करतील अशी आशा आहे, असेही ते म्हणाले. 

Web Title: Pakistan should take action against Pathankot killers - US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.