पाकने डिवचू नये, अन्यथा प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर मिळेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 06:33 AM2018-06-06T06:33:28+5:302018-06-06T06:33:28+5:30

रमझान काळात जम्मू-काश्मीरमध्ये पाळण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीचा भारतीय लष्कर नक्कीच आदर करते. मात्र सीमेपलीकडून होणा-या प्रत्येक हल्ल्याला तितकेच चोख वा त्याहून आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जाईल.

 Pakistan should not divide, otherwise every attack will get a good reply! | पाकने डिवचू नये, अन्यथा प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर मिळेल!

पाकने डिवचू नये, अन्यथा प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर मिळेल!

googlenewsNext

नवी दिल्ली : रमझान काळात जम्मू-काश्मीरमध्ये पाळण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीचा भारतीय लष्कर नक्कीच आदर करते. मात्र सीमेपलीकडून होणा-या प्रत्येक हल्ल्याला तितकेच चोख वा त्याहून आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जाईल. हल्ला झाला आणि आम्ही गप्प बसलो, असे कदापि घडणार नाही, असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दिला आहे.
मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये त्या म्हणाल्या की, सीमेपलीकडून हल्ले झाले तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे अधिकार लष्कराला देण्यात आले आहेत. भारताच्या सीमा सुरक्षित ठेवणे हे आमचे कर्तव्यच आहे. आमच्यावर हल्ले करणाºया आणि आम्हाला डिवचणाºयांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल.
रमझानच्या काळात शस्त्रसंधी पाळण्याची भारताने केलेली घोषणा व दोन्ही देशांच्या लष्करी मोहीमविषयक विभागाच्या महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) हॉटलाइनवरून झालेल्या चर्चेनंतरही पाकिस्तानने भारतीय हद्दीत हल्ले करण्याचे काही प्रकार घडले आहेत. तसेच काश्मीर खोºयात या आठवडाभरात दहशतवाद्यांनी किमान बारा ग्रेनेड हल्ले केले. या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमध्ये रमझान काळात पाळण्यात येणारी शस्त्रसंधी यशस्वी होते की नाही हे पाहणे संरक्षण मंत्रालयाचे काम नाही.
या शस्त्रसंधीची मुदत वाढविली जाऊ शकते का, या प्रश्नावर सीतारामन यांनी सांगितले की, ही घोषणा केवळ रमझानपुरती आहे. काश्मीरमध्ये रमझानकाळात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणार नाही, असे सरकारने जाहीर केले होते. या एकतर्फी शस्त्रसंधीची सुरुवात १७ मेपासून झाली होती.

रशियाकडून भारत विमाने घेणारच
भारताने आमच्याखेरीज अन्य कोणत्याही देशांकडून शस्त्रखरेदी करू नये, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. तसे करणाºया देशांवर निर्बंध घालण्यात येतील, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे. भारताने रशियाकडून लढाऊ विमाने घेण्याचा करार केला असून, तोही रद्द करण्यात यावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. त्याबाबत सीतारामन म्हणाल्या की, भारत व रशिया यांचे संबंध अतिशय जुने आहेत. आम्ही अनेक वर्षांपासून त्या देशाकडून युद्धसामग्री घेत आलो आहोत. अमेरिकेने निर्बंधांची भाषा आमच्याशी करू नये.

पाकिस्तानशी चर्चा नाही
पाकिस्तानशी चर्चा करणार का, या प्रश्नावर सीतारामन यांनी सुषमा स्वराज यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याचा दाखला दिला. दहशतवाद व चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही, असे स्वराज म्हणाल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून सीमाभागात मोठ्या प्रमाणावर हल्ले चढविण्यात येत आहेत. या वर्षी आतापर्यंत पाकिस्तानने सीमेवर व नियंत्रणरेषेवर ९०८ वेळा हल्ले केले आहेत.

राफेलच्या खरेदीत घोटाळा नाही
राफेल लढाऊ विमानांच्या
खरेदी व्यवहारात कोणताही घोटाळा झालेला नाही. फ्रान्सकडून ही विमाने घेण्यात येणार आहेत. या प्रकरणी होत असलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत.
इतर देशांची खरेदी किंमत व भारत देणार असलेली किंमत यांची चुकीची व खोटारडी तुलना काही जण करतात, असा टोला सीतारामन यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

Web Title:  Pakistan should not divide, otherwise every attack will get a good reply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.