बॅँक कर्मचार्‍यांचे मागण्यांसाठी खासदारांना साकडे मागण्यांबाबत विचार करण्यासाठी तगादा

By admin | Published: November 22, 2014 11:29 PM2014-11-22T23:29:50+5:302014-11-22T23:29:50+5:30

कसबा बावडा : विविध मागण्यांसाठी वर्षातून दोन-तीनदा संप करणार्‍या राष्ट्रीयकृत बॅँक कर्मचारी संघटनांनी या प्रश्नांची त्वरित तड लागावी म्हणून आता देशभरातील सर्वच पक्षांच्या खासदारांमागे तगादा लावण्यात सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन देऊन विचार व्हावा, अशी विनंतीही करीत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून संघटनेचे पदाधिकारी खासदारांना प्रत्यक्ष भेटून, असे निवेदन देत आहेत. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना आज, शनिवार संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.

In order to ask MPs to come together for the demands of the bank employees, | बॅँक कर्मचार्‍यांचे मागण्यांसाठी खासदारांना साकडे मागण्यांबाबत विचार करण्यासाठी तगादा

बॅँक कर्मचार्‍यांचे मागण्यांसाठी खासदारांना साकडे मागण्यांबाबत विचार करण्यासाठी तगादा

Next
बा बावडा : विविध मागण्यांसाठी वर्षातून दोन-तीनदा संप करणार्‍या राष्ट्रीयकृत बॅँक कर्मचारी संघटनांनी या प्रश्नांची त्वरित तड लागावी म्हणून आता देशभरातील सर्वच पक्षांच्या खासदारांमागे तगादा लावण्यात सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन देऊन विचार व्हावा, अशी विनंतीही करीत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून संघटनेचे पदाधिकारी खासदारांना प्रत्यक्ष भेटून, असे निवेदन देत आहेत. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना आज, शनिवार संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
२५ टक्के पगारवाढ करा, पाच दिवसांचा आठवडा करा, नवीन नोकर भरती करा, बॅँकांचे विलिनीकरण नको, कार्पोरेट थकबाकीदारांवर कारवाई करा, सुधारित पेन्शन धोरण राबवा, या व अन्य मागण्यांसाठी आतापर्यंत अनेकवेळा संप, निदर्शने, चर्चा, बैठका झाल्या; परंतु समाधानकारक तोडगा निघाला नाही. केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यावर आपल्या मागण्या मान्य होतील, असा आशावाद कर्मचारी संघटनेला होता. मात्र, प्रश्न निकालात निघत नाही म्हटल्यावर १२ नोव्हेंबरला संप करण्यात आला. आता देशभरातील सर्व पक्षांच्या खासदारांना भेटून त्या त्या भागातील कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी निवेदन देऊन आपली भूमिका खासदारांच्या कानावर घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार धनंजय महाडिक यांची आज, शनिवारी बॅँक ऑफ इंडिया कर्मचारी संघटनेचे अशोक चौगले, राजाराम परीट, दिलीप पाडळे, बळवंत कुर्‍हाडे, सुनील देसाई यांनी भेट घेऊन विविध मागण्यांची आणि पुढे काही दिवसांनी करण्यात येणार्‍या संपाची माहिती दिली. खासदार महाडिक यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी तसेच अर्थमंत्र्यांशी या विषयावर बोलू, असे आश्वासन दिले असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी २ ते ७ डिसेंबर असे सलग चार दिवस विभागवार कर्मचारी संघटना संपावर जाणार आहेत.

Web Title: In order to ask MPs to come together for the demands of the bank employees,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.