एकवेळ डोंगर हलवणं सोपं, पण आम्हाला नाही...चीनची भारताला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:08 PM2017-07-24T12:08:35+5:302017-07-24T12:09:17+5:30

भारताने माघार घेतली नाही तर डोकलाममधील आमच्या सैनिकांची संख्या वाढवू अशी धमकी चीनने दिली आहे

One-time easy to move mountains, but not us ... China threatens India | एकवेळ डोंगर हलवणं सोपं, पण आम्हाला नाही...चीनची भारताला धमकी

एकवेळ डोंगर हलवणं सोपं, पण आम्हाला नाही...चीनची भारताला धमकी

Next
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 24 - डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीन आतापर्यंत सरकारी मीडियाच्या माध्यमातून भारताला युद्दाची धमकी देत आला आहे, मात्र आता तर चीनने उघडपणे भारताला युद्धासाठी चेतावणी दिली आहे. एकवेळ डोंगर हलवणं सोपं आहे, मात्र चीन लष्कराला नाही, त्यामुळे भारताने डोकलाममधून मागे हटावं असा इशारा चीनने भारताला दिला आहे. भारताने माघार घेतली नाही तर डोकलाममधील आमच्या सैनिकांची संख्या वाढवू असं चीन लष्कराचे प्रवक्ते बोलले आहेत. 

संबंधित बातम्या
डोकलाम वाद चिघळल्यास होईल भीषण युद्ध, चिनी माध्यमांची धमकी
डोकलाम प्रकरणी चीनला नव्हती भारताकडून आक्रमकतेची अपेक्षा
डोकलाम वाद : चीन लपवत आहे 1890 कराराचं सत्य ?
तिढा वाढला! भारतापाठोपाठ चीननेही डोकलाममध्ये ठोकले तंबू
 
चीन लष्कराचे प्रवक्ते वू कियाने यांनी भारताला धमकी देताना सांगितलं आहे की, "चीन लष्कराचा 90 वर्षांचा इतिहास आमची ताकद आणि किती सक्षम आहोत हे दर्शवतं. एकवेळ डोंगर हलवणं सोपं आहे, मात्र लष्कराला नाही". पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, "भारताने कोणत्याही भ्रमात राहू नये. आमच्या मातृभूमीचं संरक्षण करण्यासाठी कोणतीही किंमत चुकवू". 
 
डोकलाममधील संपुर्ण वाद चीनने रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यानंतर सुरु झाला होता. त्याचा उल्लेख करताना कियान यांनी सांगितलं की, "जून महिन्याच्या मध्यंतरी चीनने आपल्या क्षेत्रात रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला होता. डोकलाम चीनचा परिसर असून, चीनने आपल्या क्षेत्रात एखादा रस्ता बांधणे सामान्य घटना आहे". भारतावर सीमोल्लंघनाचा आरोप करत ते पुढे बोलले की, "भारताने चीनमध्ये घुसखोरी करणे हे आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन असून गंभीर प्रकरण आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे". 
 
जोपर्यंत भारतीय सैनिक माघारी फिरत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही असं चीनने याआधीही सांगितलं आहे. आपल्या या भूमिकेची पुनरावृत्ती करताना चीन लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "भारताने आपलं सैन्य मागे घ्यावं यासाठी आम्ही भारताला आग्रह करत आहोत. ही समस्या सोडवण्यामध्ये ही अट महत्वाची आहे". 
 
चीनमधील प्रसारमाध्यमं वारंवार युद्धाच्या धमक्या देत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपण कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही हे भारतानेही स्पष्ट केलं आहे. भारतीय लष्कराने डोकलाममध्ये तंबू ठोकत कोणत्याही किमतीवर मागे हटणार नसल्याचे संकेत दिले आहेत. 

 

Web Title: One-time easy to move mountains, but not us ... China threatens India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.