जैन धर्माची शिकवण अहिंसा, शाकाहार कोविड-१९ वरील प्रभावी प्राचीन लस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:12 AM2020-03-05T06:12:07+5:302020-03-05T06:12:33+5:30

मांसाहार हा स्थितीजन्य आणि संस्कृतीशी संबंधित आहे. असे अनेक धर्मांत सांगण्यात आले असले तरी मांसाहार केलाच पाहिजे, असा प्रबळ समज आहे.

Non-Violence Teaching of Jainism, an effective ancient vaccine on vegetarian Kovid-29 | जैन धर्माची शिकवण अहिंसा, शाकाहार कोविड-१९ वरील प्रभावी प्राचीन लस

जैन धर्माची शिकवण अहिंसा, शाकाहार कोविड-१९ वरील प्रभावी प्राचीन लस

googlenewsNext

कोविड-१९च्या उद्रेकामुळे मानवी जीवनात सर्व धर्मांना स्थान आहे, या महत्त्वपूर्ण शिकवणीकडे लक्ष केंद्रित झाले आहे. या पार्श्वभूमीवर अहिंसा आणि शाकाहार जीवनशैली ही जैन धर्माची शिकवण सर्वश्रेष्ठच ठरते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मांसाहार हा स्थितीजन्य आणि संस्कृतीशी संबंधित आहे. असे अनेक धर्मांत सांगण्यात आले असले तरी मांसाहार केलाच पाहिजे, असा प्रबळ समज आहे. मांस चांगले आहे; परंतु सर्व प्रकारचे मांस चांगले नसते.
मानवप्राणी तीन लाख वर्षे शिकार करीत होता. वन्यप्राण्यांचे मांस आणि कंद-मूळवर्गीय वनस्पतीवर जगत; परंतु मानवप्राणी निसर्गाशिवाय वेगळा नव्हता. मानवप्राणी निसर्गाचा भाग होता. १२ हजार वर्षांपूर्वी हवामान बदलामुळे प्राणी आणि अंकुरित वनस्पती नष्ट झाल्यानंतर मानवाला शेती आणि पशुपालनाकडे वळणे भाग पडले.
बायबल या धर्मग्रंथात पहिल्याच अध्यायात भाजीपाल्यास प्राधान्य नमूद करण्यात आले आहे. नंतर, प्रभू, म्हणतात की, मी पृथ्वीवर विविध प्रकारच्या बीजांकुरित वनस्पती आणि फळवर्गीय वृक्ष दिली आहेत. या वनस्पती आणि फळवर्गीय वृक्ष तुम्हाला भक्षण करण्यासाठी दिल्या आहेत. मांस भक्षणाचा उल्लेख या पहिल्या अध्यायात नाही.
चौथ्या अध्यायात शेती आणि पशुपालन या नागरी जीवनशैलीशी संघर्ष आढळतो. येथे कहाणी अंधकारमय होते. कारण एक संतप्त शेतकरी केन हा पशुपालनाचा समर्थक असलेला भाऊ अबेल याची हत्या करतो. या मर्मभेदी नाट्यात आफ्रिकेतील पशुपालक आणि शेतकऱ्यांतील संघर्ष दाखविण्यात आलेला आहे. पश्चिम आशिया समाजात पशुपालकांचे प्राबल्य असल्याने नवव्या अध्यायात म्हटले आहे की, वनस्पतीप्रमाणे सर्व प्राणिमात्र तुमचे अन्न आहे. आता मी तुम्हाला सर्व काही दिले आहे.
हा अध्याय लक्षपूर्वक वाचल्यास तुमच्या लक्षात येईल की, हिरव्यागार पालेभाज्या पोषणाचा मुख्य स्रोत आहे. बायबलच्या तिसºया आवृत्तीत कोणते मांस खाण्यायोग्य आहे, कोणते मांस निषिद्ध आहे, हे नमूद करण्यात आले आहे. शाकाहाराचा जोरदार पुरस्कार करणारा जैन हा एकमेव समाज आहे. जैनधर्मीय कोणत्याही प्रकारच्या मांसाला कधीच स्पर्श करीत नाहीत. जैन धर्म अडीच ते तीन हजार वर्षे जुना आहे.
या काळात त्यांच्या या विलक्षण शाकाहारी जीवनशैलीबाबत मांसप्रेमींनाही कुतूहल वाटायचे. कोविड-१९, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू, निपाह यासारख्या रोगांच्या वाढता प्रादुर्भावाचा जग मुकाबला करीत असताना जैन धर्म अवघ्या जगासाठी प्रेरणास्रोत बनला आहे. अहिंसा हे जैन धर्माचे तत्त्व आहे. त्यामुळे जैन धर्मीय कधी झाडे-झुडपी तोडणे टाळतात. वृक्षवल्ली नष्ट झाल्यास मानवप्राणीही जगणार नाही. धार्मिक तत्त्वाबरोबर हे पारिस्थितिक पर्यावरणसूज्ञ तत्त्व आहे. मांस, मटणामुळे जबर किंमत मोजावी लागेल, हे ध्यानात ठेवूनच आधीपासूनच जैन समाज मांसाहारापासून अलिप्त आहे.
गत अनुभवापासून संचित केलेल्या ज्ञानाचे भांडार प्रत्येक धर्मात आहे, असा धडा कोविड-१९ या रोगाने दिला आहे. पृथ्वीवरील बदलात छोट्या धर्मानेही वैश्विक मूल्य सिद्ध केले आहे. शाकाहार म्हणजे सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंवर प्राचीन जैन लस होय.
-जोएचिम एनजी
>शाकाहार निरोगी जीवनाचा आधार आहे. अहिंसा हे जैन धर्माचे तत्त्व आहे. धार्मिक तत्त्वाबरोबर अहिंसा हे पारिस्थितिक पर्यावरण सूज्ञ तत्त्वही आहे. कोरोना विषाणूंचे मूळ, त्याचा जगभर होत असलेला वाढता प्रादुर्भाव आणि ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी जागतिक पातळीवर संशोधनासह विविध उपाय योजले जात आहेत. एकीकडे अनेक रोगांचे निर्मूलन होत असताना नवीन विषाणूंची उत्पत्ती होत आहे. या पार्श्वभूमीवर जैन धर्माचे अहिंसा हे तत्त्व आणि शाकाहाराचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख.

Web Title: Non-Violence Teaching of Jainism, an effective ancient vaccine on vegetarian Kovid-29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.