INDIA-भारत वाद; नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांचे प्रथमच भाष्य, स्पष्ट शब्दांत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 09:07 AM2023-09-08T09:07:41+5:302023-09-08T09:08:27+5:30

INDIA Vs Bharat Controversy: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी भाजपला रामराम केला असून, आता पक्षात राहणे अशक्य आहे, असे म्हटले आहे.

netaji subhash chandra bose great grandson chandra kumar bose first reaction on india vs bharat controversy | INDIA-भारत वाद; नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांचे प्रथमच भाष्य, स्पष्ट शब्दांत म्हणाले...

INDIA-भारत वाद; नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांचे प्रथमच भाष्य, स्पष्ट शब्दांत म्हणाले...

googlenewsNext

INDIA Vs Bharat Controversy: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने भाजपला चितपट करण्यासाठी तयारी सुरू केली असून, भाजपने विरोधकांचे आव्हान परतून लावण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपला रामराम केला असून, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यातच सध्या देशभरात सुरू असलेल्या इंडिया विरुद्ध भारत या वादावर चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आता मला पक्षात राहणे शक्य नाही, असे ते म्हणाले. २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून प्रेरणा मिळाली होती. माझी जीवनतत्त्वे माझे आजोबा शरतचंद्र बोस व त्यांचे धाकटे बंधू नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शिकवणीवर आधारलेली आहेत. त्यांनी प्रत्येक धर्माकडे भारतीय म्हणून पाहिले होते. फुटीरतावाद आणि जातीयवादाच्या राजकारणाविरुद्ध त्यांनी लढा दिला, असे चंद्र कुमार बोस यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले. इंडिया की भारत याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. केंद्र सरकारने संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यावर चंद्र कुमार बोस यांनी थेट भाष्य केले.

चंद्र कुमार बोस नेमके काय म्हणाले?

भारताची जी राज्यघटना आहे, त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘इंडिया दॅट इज भारत, अ युनियन ऑफ स्टेट्स’. त्यामुळे भारत आणि इंडिया ही एकच बाब आहे. त्यात कोणताच फरक नाही. तुम्ही इंडिया म्हणा किंवा भारत म्हणा. हा मुद्दा एकच आहे. त्यामुळे इंडिया की भारत यावरून जो वाद सुरु आहे, तो निरर्थक आहे, असे चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करताना बोस बंधूंच्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, नंतर यासाठी आपणाला कोणतेही सहाय्य मिळाले नाही, असा आरोप बोस यांनी केला. गेल्या काही वर्षांपासून बोस सातत्याने विविध मुद्दयांवर भाजप आणि पक्षाच्या राज्य नेतृत्वाच्या धोरणांवर टीका करत होते. आता आपल्याला पक्षात राहणे अशक्य झाले आहे, असे चंद्र कुमार बोस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. 

 

Web Title: netaji subhash chandra bose great grandson chandra kumar bose first reaction on india vs bharat controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.