लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक, रामदेवबाबांच्या वक्तव्याला गिरिराज सिंहांचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 01:37 PM2019-05-28T13:37:51+5:302019-05-28T14:03:55+5:30

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र...

Need a law for population control, Giriraj Singh's support to Ramdev's statement | लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक, रामदेवबाबांच्या वक्तव्याला गिरिराज सिंहांचे समर्थन

लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक, रामदेवबाबांच्या वक्तव्याला गिरिराज सिंहांचे समर्थन

Next

बेगुसराय - लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही आहे. बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा खासदार गिरिराज सिंह यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत योगगुरू रामदेब बाबा यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.  तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक असल्याचेही गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे. 

तिसऱ्या अपत्याला मताधिकार आणि सरकारी नोकऱ्यांपासून वंचित करण्यात यावे, असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला होता. दरम्यान, गिरिराज सिंह यांनी रामदेव बाबांच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ''रामदेव बाबांच्या वक्तव्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे. तसेच देशाच्या विकासासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची आवश्यकता आहे.'' असे गिरिराज सिंह यांनी सांगितले. 




दरम्यान, रामदेवबाबांनी केलेल्या वक्तव्याबाबत ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकांना असंवैधानिक गोष्टी बोलण्यापासून रोखण्यासाठी कुठलाही स्पष्ट कायदा नाही आहे. मात्र रामदेवबाबांच्या विचारांना अकारण महत्त्व दिले जाते., असे ओवेसी म्हणाले होते. 

हरिद्वार येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी देशाची लोकसंख्या दीडशे कोटींच्यावर जाऊ देता कामा नये. तिसऱ्या अपत्याला मताधिकार आणि सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवणारा कायदा झाला तरच हे शक्य होईल, असे सांगितले होते.  

Web Title: Need a law for population control, Giriraj Singh's support to Ramdev's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.