नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, दिग्विजय सिंह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 05:48 PM2019-03-11T17:48:58+5:302019-03-11T17:58:06+5:30

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, असा दावा केला आहे. 

Narendra Modi is not going to become the Prime Minister for sure - Digvijay Singh | नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, दिग्विजय सिंह यांचा दावा

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, दिग्विजय सिंह यांचा दावा

ठळक मुद्देआगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे.'गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. ''नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत'

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यामध्ये आपल्या कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, असा दावा केला आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा चांगला निकाल येईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. याचबरोबर, दिग्विजय सिंह यांनी भाजपावर निशाना साधला आहे. ते म्हणाले, 'लष्कर आणि देशाची सुरक्षा कधाही राजकारणाचा मुद्दा बनवण्यात येऊ नये. निवडणूक आयोगाने सुद्धा यावर निर्देश दिले आहे. 


दिग्विजय सिंह यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईवर एक विधान केले होते. ज्या प्रकारे अमेरिकेने ओसामा बिन लादेनवर केलेल्या कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले होते. त्यावेळी दिग्विजय सिंह म्हणाले होते, 'भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईवर मी प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र, या भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचे सॅटेलाईटच्या माध्यमातून फोटो मिळणे शक्य आहे. ज्याप्रकारे अमेरिकेने ओसामा कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले. तसेच, सरकारनेही आपल्या भारतीय हवाई दलाने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बाबतीत करायला हवे.'

दरम्यान, 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Narendra Modi is not going to become the Prime Minister for sure - Digvijay Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.