Narendra Modi Exclusive: राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी; बघा काय म्हणाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 05:17 PM2019-04-28T17:17:34+5:302019-04-28T17:18:16+5:30

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवत नसलेल्या राज ठाकरे यांना आपल्या आगळ्यावेगळ्या प्रचारशैलीद्वारे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेरीस आणले आहे.

Narendra Modi Exclusive: Prime Minister Modi answer to Raj Thackeray | Narendra Modi Exclusive: राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी; बघा काय म्हणाले!

Narendra Modi Exclusive: राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी; बघा काय म्हणाले!

googlenewsNext

>> ऋषी दर्डा, संपादकीय संचालक, लोकमत

>> यदु जोशी, वरिष्ठ सहायक संपादक

 यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवत नसलेल्या राज ठाकरे यांना आपल्या आगळ्यावेगळ्या प्रचारशैलीद्वारे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेरीस आणले आहे. ए लाव रे तो व्हि़डीओ असे म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या धोरणांची पोलखोल केली होती. त्यामुळे प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत भाजपाला बॅकफूटवर जावे लागले होते. दरम्यान, ‘लोकमत’ समूहाचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक यदु जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

राज ठाकरे आधी आपले प्रशंसक होते. मात्र, आता त्यांनी मोदी-शहा यांच्या विरोधात रान उठविले आहे. याबद्दल आपल्याला काय वाटते?
हा राजकारणाचा भाग आहे. आजकाल ‘आउटसोर्सिंग’ केले जाते. हेही तसेच आहे. जनता हुशार आहे. कोण काय आणि कशासाठी बोलत आहे हे जनतेला नीट कळते. मतदानातून ते दाखवून देतात. गुजरातमध्येही विधानसभा निवडणुकीत असेच ‘आउटसोर्सिंग’ झाले होते. काही तरुणांना काँग्रेसी लोकांनी हाताशी धरून त्यांचा वापर करून घेतला, पण त्याने तेव्हाही काही साध्य झाले नाही. 

 महाराष्ट्रात शिवसेना सातत्याने भाजप आणि आपल्यावर सडकून टीका करीत होती आणि ती आता सरकारची प्रशंसा करतेय!
भाजप व शिवसेना हे महाराष्ट्राचे सरकार साडेचार वर्षांपासून यशस्वीपणे चालवत आहेत. काही दशकांपासूनचा आमचा स्रेह आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलजींचा आशीर्वाद लाभलेली ही युती आहे. आम्ही राजकारणात एकमेकांचे नैसर्गिक भागिदार आहोत. भाजप-शिवसेना हे पक्ष सोबतच मोठे झालेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यात वैचारिक साम्यही आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुम्हाला सहकारी मित्रपक्षांची चिंता नव्हती. आता केंद्रात एनडीएमधील एवढ्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करणे कितपत आव्हानात्मक होते?

प्रादेशिक अस्मिता आणि अपेक्षा यांना आम्ही नेहमीच किंमत देतो. देशाच्या विकासाच्या वाटचालीत प्रादेशिक अस्मिता आणि अपेक्षांना किती आणि कसे महत्त्व आहे, याची दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिल्याने मला जाणीव आहे. २०१४ मध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. तरीही सरकार स्थापन करताना आम्ही मित्रपक्षांना सोबत घेतले. त्यांनीही गेल्या पाच वर्षांत सरकार चालविण्यात जे भरीव योगदान दिले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आम्ही लोकशाहीचा सन्मान करतो आणि जास्तीतजास्त लोकांना सोबत घेऊन जाण्यानेच लोकशाही बळकट होते, यावर आमचा ठाम विश्वास आहे. सरकार बहुमताने स्थापन करता येते, पण सार्वमत असल्याखेरीज ते चालविता येत नाही, यावर आमचा विश्वास आहे.
आम्ही तसे आचरणही करतो. देशाच्या हितासाठी केवळ मित्रपक्षांनाच नव्हे, तर विरोधी पक्षांनाही सोबत घेऊन काम करणे हे आमचे ब्रिद आहे.

Web Title: Narendra Modi Exclusive: Prime Minister Modi answer to Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.