मेट्रोतून प्रवास करत मोदी, टर्नबुल यांनी दिली अक्षरधाम मंदिराला भेट

By admin | Published: April 10, 2017 06:32 PM2017-04-10T18:32:14+5:302017-04-10T18:32:14+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत दौऱ्यावर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबूल यांनी आज राजधानीत मेट्रोप्रवासाचा आनंद

Modi, Turnbull visited the temple of Akshardham, traveling through the Metro | मेट्रोतून प्रवास करत मोदी, टर्नबुल यांनी दिली अक्षरधाम मंदिराला भेट

मेट्रोतून प्रवास करत मोदी, टर्नबुल यांनी दिली अक्षरधाम मंदिराला भेट

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  भारत दौऱ्यावर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबूल यांनी आज राजधानीत मेट्रोप्रवासाचा आनंद घेतला.  मोदी आणि टर्नबुल दिल्लीतील मंडी हाऊस मेट्रो स्थानकातून अक्षरधाम मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करून अक्षरधाम मंदिरात पोहोचले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रोमधून प्रवास करत असल्याचे समजल्यावर मेट्रो स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. तसेच उपस्थितांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.
मेट्रोतील प्रवासादरम्यान टर्नबूल यांनी मोदींसोबत सेल्फी घेतल्या. अक्षरधाम मेट्रो स्थानकात उतरल्यानंतर मोदी आणि टर्नबुल स्वामिनाराय मंदिरात गेले. तेथे दोन्ही नेत्यांनी मंदिराची वैशिष्ट्ये जाणून घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनातून मंदिराच्या आवारात फेरफटकाही मारला. तसेच जलविहाराचाही आनंद घेतला. 
दिल्लीतील यमुना नदीच्या किनारी वसलेल्या या मंदिराचे 6 नोव्हेंबर2005 रोजी उद्धाटन झाले होते. हे मंदिर दर सोमवारी सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत असते. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सकाळी झालेल्या प्रतिनिधी स्तरावरील चर्चेमध्ये दोन्ही देशांमध्ये दहशतवादाचा सामना करण्याबरोबरच अन्या सहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.  

Web Title: Modi, Turnbull visited the temple of Akshardham, traveling through the Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.