हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भयंकर भूस्खलन, बस स्टँड जवळील अनेक घरं जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 11:15 AM2023-08-24T11:15:01+5:302023-08-24T11:15:57+5:30

Kullu Landslide: आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास, बसस्टँडजवळ झालेल्या या लँडस्लायडिंगमध्ये जवळपास 8 ते 9 इमारती क्षणात जमीनदोस्त झाल्या. 

many buildings destroyed due to Massive landslide in Himachal Pradesh's Kullu | हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भयंकर भूस्खलन, बस स्टँड जवळील अनेक घरं जमीनदोस्त

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भयंकर भूस्खलन, बस स्टँड जवळील अनेक घरं जमीनदोस्त

googlenewsNext

हिमाचल प्रदेशात कुल्लू जिल्ह्यातील अन्नी येथे भयंकर भूस्खलन झाल्याने अनेक घरांना याचा मोठा फटका बसला. यात येथील बसस्टँड जवळील अनेक घरे जमीनदोस्त झाली आहे. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास, बसस्टँडजवळ झालेल्या या लँडस्लायडिंगमध्ये जवळपास 8 ते 9 इमारती क्षणात जमीनदोस्त झाल्या. 

सुदैवाची गोष्ट म्हणजे, या इमारतींमध्ये कुणीही राहत नव्हते. कारण प्रशासनाने एक आठवड्यापूर्वीच या इमारती खाली केल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे ही घटना घडली आहे.

पहाडांवरून आलेल्या मलब्यामुळेही लोकांच्या घराचे मोठे नुकसान -
खरे तर, गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात जबरदस्त पाऊस पडत आहे. यामुळे येथील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे मंडीतही भीतीचे वातावरण आहे. येथील रिसाज भागात ढगफुटीमुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. येथील लोकांनी येतून सुरक्षित स्थळी पोहोचून, आपला जीव वाचवला आहे. कांगडा येथील कोटला येथेही नैसर्गित आपत्तीने धुमाकूळ घातला आहे. येथे लँडस्लाइड झाल्यानंतर घरांमध्ये मलबा शिरला आहे. यामुळे लोकांना प्रचंड त्रास होत आहे. एवढेच नाही, तर पहाडांवरून आलेल्या मलब्यामुळेही लोकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: many buildings destroyed due to Massive landslide in Himachal Pradesh's Kullu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.