चेन्नईत कुत्र्यांचं रक्तदान शिबीर, मद्रास व्हेटर्निटी कॉलेजचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 08:40 AM2018-10-30T08:40:41+5:302018-10-30T08:45:32+5:30

चेन्नईत सोमवारी (29 ऑक्टोबर) कुत्र्यांचं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या चेन्नईतील मद्रास व्हेटर्निटी कॉलेजतर्फे प्राण्याच्या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

Madras Veterinary College conducted a voluntary dog blood donation camp on its campus | चेन्नईत कुत्र्यांचं रक्तदान शिबीर, मद्रास व्हेटर्निटी कॉलेजचा अनोखा उपक्रम

चेन्नईत कुत्र्यांचं रक्तदान शिबीर, मद्रास व्हेटर्निटी कॉलेजचा अनोखा उपक्रम

googlenewsNext

चेन्नई - माणसांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन हे अनेक ठिकाणी करण्यात येत असतं. मात्र चेन्नईत सोमवारी (29 ऑक्टोबर) कुत्र्यांचं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या चेन्नईतील  मद्रास व्हेटर्निटी कॉलेजतर्फे प्राण्यांच्या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरात जवळपास 50  कुत्र्यांचा सहभाग होता. 



कुत्र्यांच्या रक्तदान शिबिरात गोळा केलेलं रक्त तनुवास रक्तपेढीमध्ये साठवलं जाणार आहे. रक्तदान केलेल्या कुत्र्यांना डोनर कार्डही देण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात 50 कुत्र्यांनी सहभाग घेतला असून 11 कुत्र्यांनी रक्तदान केलं. प्राण्यांना रक्ताची गरज असल्यास ब्लड बँक असावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. पाळीव प्राण्यांना काही इजा झाली किंवा रक्ताची आवश्यकता भासली तर ते या रक्ताचा वापर करू शकणार आहे. 

Web Title: Madras Veterinary College conducted a voluntary dog blood donation camp on its campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.