.... नाहीतर अनेकांचे ब्रेकअप होतील; कन्हैया कुमार यांच्या विनंतीवर राहुल गांधी खळखळून हसले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 06:22 PM2022-11-10T18:22:42+5:302022-11-10T18:22:53+5:30

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. या यात्रेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

Lower the jammer's band, or many will break up Rahul Gandhi also laughed at Kanhaiya Kumar's request congress bharat jodo yatra | .... नाहीतर अनेकांचे ब्रेकअप होतील; कन्हैया कुमार यांच्या विनंतीवर राहुल गांधी खळखळून हसले

.... नाहीतर अनेकांचे ब्रेकअप होतील; कन्हैया कुमार यांच्या विनंतीवर राहुल गांधी खळखळून हसले

googlenewsNext

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. या यात्रेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.यात्रा रोज सायंकाळी थांबते आणि राहुल गांधींसह इतर प्रवासी विश्रांती घेत असतात. कालही यात्रा विश्रांतीसाठी थांबली होती, यावेळी नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती.यावेळी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी राहुल गांधींना एक विनंती केली. या विनंतीवरुन सर्वाच्यात एकच हशा पिकला. 

राहुल गांधी यांनी त्यांच्या यूट्यूब अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधींसह अन्य युवा नेत्यांमध्ये तरुण नेते कन्हैया कुमार उपस्थित आहेत.

यावेळी कन्हैया कुमार यांनी राहुल गांधी यांना सांगितले की, प्रवासादरम्यान चालणाऱ्या जॅमरचा बँड कमी करावा. नाहीतर अनेकांचा घटस्फोट होईल, ब्रेकअप होईल. अनेकांना फोनवर बोलता येत नाही. कन्हैया कुमार यांचे हे ऐकून उपस्थित लोकांना हसू आवरेना. राहुल गांधीही या लोकांसोबत हसताना दिसले. 

भारत जोडो यात्रेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने जॅमरही आहेत. या जॅमरचे कारण म्हणजे फोनचे नेटवर्क काम करत नाही आणि लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलण्यात त्रास होतो. याचा संदर्भ देत कन्हैया कुमार यांनी गंमतीने म्हणाले की, जॅमरचे स्पीड कमी केले पाहिजे जेणेकरून लोकांना त्यांच्या मित्रांशी घरी सहज बोलता येईल.

Web Title: Lower the jammer's band, or many will break up Rahul Gandhi also laughed at Kanhaiya Kumar's request congress bharat jodo yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.