राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या एकत्रित मतांपेक्षा नोटाला अधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 05:05 PM2017-12-18T17:05:27+5:302017-12-18T17:06:40+5:30

गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकीतील मतांची मोजणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये मतदारांनी नोटाला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे.

Lot more likes than the combined vote of Nationalist Congress Party and Bahujan Samaj Party | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या एकत्रित मतांपेक्षा नोटाला अधिक पसंती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या एकत्रित मतांपेक्षा नोटाला अधिक पसंती

Next

मुंबई- गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकीतील मतांची मोजणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये मतदारांनी नोटाला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुजरातमध्ये 5 लाखांहून अधिक मतदारांनी नोटाचे बटण दाबून यापैकी एकही उमेदवार पसंत नसल्याचे मत नोंदवले आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बहुजन समाजाला मिळालेल्या एकत्रित मतांपेक्षा अधिक पसंती नोटाला मिळाली आहे.

गुजरातमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला 1 लाख 83 हजार 834 मते तर बहुजन समाज पार्टीला 2 लाख 5 हजार 447 मते मिळाली आहेत तर नोटाला 5 लाख 46 हजार 206 जणांनी पसंती दिली आहे. गुजरातच्या विकासासाठी आम्हालाच निवडा असे सांगणारा भाजपा आणि भाजपाला आम्हीच पर्याय ठरू शकतो असे सांगणाऱ्य़ा कॉंग्रेससाठी नोटाने हे मोठे उत्तरच दिले आहे असे म्हणावे लागेल. हिमाचल प्रदेशातही नोटाला 32 हजार 750 लोकांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या राज्यात बहुजन समाज पार्टीला केवळ 17 हजार 327 मते मिळाली आहेत.

इव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा हार्दिकचा आरोप
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला निसटता विजय मिळवण्यात यश मिळाल्यानंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल याने इव्हीएममध्ये झालेल्या गडबडीमुळे भाजपाचा विजय झाला, सनसनाटी आरोप केला आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मिळून इव्हीएमविरोधात आंदोलन छेडले पाहिजे असे आवाहन केले. तसेच गुजरातमध्ये यापुढेही पाटीदार आरक्षणाचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू करणार असल्याचा इशाराही त्याने दिला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना हार्दिक पटेलने भाजपाच्या विजयामध्ये इव्हीएमचा हात असल्याचा थेट आरोप केला. त्याने दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रामध्ये भाजपाने इव्हीएममध्ये घोळ केल्याचा दावा हार्दिक पटेलने केला. तसेच धोकेबाजी करून निवडणुक जिंकणाऱ्या भाजपाला शुभेच्छा अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.

Web Title: Lot more likes than the combined vote of Nationalist Congress Party and Bahujan Samaj Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.