वसुंधरा राजेंचा निष्ठावंत लोकसभा अध्यक्षांना टक्कर देणार; कोटामधून प्रल्हाद गुंजाळ रणांगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 06:41 PM2024-03-25T18:41:37+5:302024-03-25T18:44:17+5:30

लोकसभा निवडणुका जाहीर करुन आठवडा उलटला तरीही अजून देशात पक्षांनी उमेदवारांची नाव जाहीर केलेली नाही. दरम्यान, आज काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली आहे.

loksabha election Vasundhara Raje's close Prahlad Gunjal was fielded by the Congress against BJP's Om Birla | वसुंधरा राजेंचा निष्ठावंत लोकसभा अध्यक्षांना टक्कर देणार; कोटामधून प्रल्हाद गुंजाळ रणांगणात

वसुंधरा राजेंचा निष्ठावंत लोकसभा अध्यक्षांना टक्कर देणार; कोटामधून प्रल्हाद गुंजाळ रणांगणात

लोकसभा निवडणुका जाहीर करुन आठवडा उलटला तरीही अजून देशात पक्षांनी उमेदवारांची नाव जाहीर केलेली नाही. दरम्यान, आज काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीत दिग्गज नावांचा समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेसने कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपाच्या दुसऱ्या यादीतही उदयनराजेंना स्थान नाही; सातारा वेटींग लिस्टमध्येच

१९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एकूण १९० उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने अजमेरमधून रामचंद्र चौधरी, राजसमंदमधून सुदर्शन रावत, भिलवाडामधून दामोदर गुर्जर आणि तिरुनेलवेलीमधून सी रॉबर्ट ब्रुस यांना उमेदवारी दिली आहे.

गुरूवारी प्रल्हाद गुंजाल यांनी जयपूरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राजस्थान काँग्रेसचे प्रमुख गोविंद सिंह दोतासराच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय प्रल्हाद गुंजाल यापूर्वी कोटा उत्तरमधून दोन वेळा आमदार होते, पण गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. गुंजाळ यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला फायदा होऊ शकतो. 

दोन दिवसापूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश  

कोटा उत्तरचे भाजपचे माजी आमदार प्रल्हाद गुंजाळ यांनी गुरुवारी २१ मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी  शेकडो कार्यकर्त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची ६ वी यादी जाहीर

 काँग्रेसकडून आत्तापर्यंत उमेदवारांच्या नावांच्या ५ याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. रविवारी ५ वी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये, चंद्रपूरमधील प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता, काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली असून ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १२ उमेदवारांच्या नावांची काँग्रेसकडून घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसने रविवारी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. राजस्थानमधून दोन आणि महाराष्ट्रातून एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. राजस्थानमधील जयपूरमधून प्रताप सिंह खचरियावास यांना तिकीट देण्यात आले. तर, जयपूरपूर्वी सुनील शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली होती. दरम्यान, दौसाचे आमदार मुरारी लाल मीना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांचे नाव निश्चित केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती सुरेश धानोरकर चंद्रपूरमधून विजयी झाले होते.

Web Title: loksabha election Vasundhara Raje's close Prahlad Gunjal was fielded by the Congress against BJP's Om Birla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.