शरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:23 PM2018-12-13T17:23:37+5:302018-12-13T17:30:09+5:30

एकाच व्यक्तीवर किंवा कुटुंबावर टीका करु नये, असे सोनिया गांधींवर टीका करताना त्यांना कळायला हवे होते. त्यांना हे कळले असते तर त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केलीच नसती, असा टोमणा शरद पवार यांना लगावला. 

Lokmat Parliamentary Awards 2018 : Sharad Pawar should have known this while criticizing on Sonia, Chief Minister | शरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा

शरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा

googlenewsNext
ठळक मुद्दे'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलासपणे भाष्य केलं आहे.फॉर्म्युल्यांच्या आधारावर भाजपाची शिवसेनेशी युती होणारच

नवी दिल्ली : एकाच व्यक्तीवर टीका करु नये, असे शरद पवार यांना 1999 साली लक्षात आले असते, तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केलीच नसती, अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला. साडेचार वर्षांपूर्वी विकासाबद्दल बोलणारे आता फक्त गांधी कुटुंबावर हल्ला का करत आहेत आणि ही टीकाच भाजपाला भोवली, असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांडले होते. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकाच व्यक्तीवर किंवा कुटुंबावर टीका करु नये, असे शरद पवार यांना वाटते. मग, त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर काय केलं?, एकाच व्यक्तीवर किंवा कुटुंबावर टीका करु नये, असे सोनिया गांधींवर टीका करताना त्यांना कळायला हवे होते. त्यांना हे कळले असते तर त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केलीच नसती, असा टोमणा त्यांनी शरद पवार यांना लगावला. 

काय म्हणाले होते शरद पवार?
'एका कुटुंबाने काही केले नाही, असे म्हणत नरेंद्र मोदी सातत्याने गांधी कुटुंबावर टीका करत राहिले. परंतु, आजच्या तरुण मतदारांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी किंवा अगदी राजीव गांधींनाही पाहिलेले नाही. त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पाहिले आहे. हे दोघेही सत्तेच्या खुर्चीवर नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करणे जनतेला रुचले नाही. उलट, साडेचार वर्षांपूर्वी विकासाबद्दल बोलणारे आता फक्त गांधी कुटुंबावर हल्ला का करताहेत, याबद्दल त्यांना आश्चर्यच वाटले आणि ही टीकाच भाजपाला भोवली', असे मत शरद पवार यांनी मांडले होते. 

या मुलाखतीचे लाइव्ह अपडेट्स

>> काही फॉर्म्युले तयार केलेत; शिवसेनेशी युती होणारच

>> राज ठाकरे माझे मित्र. मतं मांडतात, पण त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. तुम्हीही गंभीरपणे घेऊ नका. 

>> राहुल गांधींचं अभिनंदन. राजस्थान, मध्य प्रदेशात जी मतं मिळाली, ती पाहता मोठा पराभव नाही. आत्मपरीक्षण नक्कीच करू. 

>> एकाच व्यक्तीवर टीका करू नये, हे शरद पवारांना १९९९ मध्ये लक्षात आलं असतं तर राष्ट्रवादी पक्षाची स्थापनाच झाली नसती. 

>> अहंकार हे पराभवाचं कारण नाही. आम्ही जमिनीशी जोडलेली माणसं. 

>> भाजपाचा कुणीही मालक नाही. ही कुठल्याही परिवाराची गोष्ट नाही. माझ्यासारखा माणूस इथे मुख्यमंत्री बनू शकतो.

>> काँग्रेसमुक्त भारत याचा अर्थ एखाद्या पक्षापासून मुक्ती नाही, तर काँग्रेसने निर्माण केलेल्या प्रवृत्तीपासून मुक्तता देणं.

>> तीन राज्यं भाजपामुक्त कशी म्हणता येतील? राजकारणात कुणी कुणाला समाप्त करू शकत नाही, जनताच समाप्त करू शकतं. 

>> पराभव झाला हे मान्यच. पण, राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सरकारं बदलतातच. पण, यावेळी भाजपा आणि काँग्रेसमध्ये फक्त ०.५ टक्के मतांचा फरक. जो जिता वही सिकंदर, पण त्यामुळे भाजपाला नाकारलं असं म्हणता येणार नाही.

>> देशात सक्षम विरोधी पक्ष असणं चांगलं. राहुल गांधींना आणखी पाच-दहा वर्षं विरोधकांचं नेतृत्व करायचं आहे. त्यामुळे ते जितकं चांगलं लीड करताहेत, ते चांगलंच.

>> शिवसेना आमच्यासोबतच राहील. तुम्हाला जे 'तेवर' दिसतात, त्यापेक्षा वेगळे 'तेवर' आम्हाला माहीत आहेत.  

>> रामाच्या नावावर राजकारणाचा प्रश्नच नाही. हल्ली राहुल गांधी खूप देवळात जाताहेत. त्यांनी मदत केली तर राम मंदिराचा कायदाही बनू शकतो.  

>> नोटाबंदी, जीएसटीनंतर ११ राज्यांत भाजपा जिंकली, हे तुम्ही पाहात नाही. एक निवडणूक हरली तर तुम्ही असा गोंधळ करता की आम्ही पुन्हा निवडूनच येणार नाही. पण २०१९ मध्ये पुन्हा मोदीच निवडून येणार. हा अतिआत्मविश्वास नाही, आत्मविश्वास. 

>> महाआघाडी बनो, न बनो... जनतेला नरेंद्र मोदींचंच नेतृत्व हवंय.  

>> मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. मुद्रामुळे अनेकांना कर्ज मिळाली, त्यांना रोजगार मिळालाच की.

>> चार वर्षांत प्रत्येक प्रश्न संपेल असं नाही. मोदींनी चार वर्षांत पटरीवरून उतरलेली गाडी पटरीवर आणली आहे, आता ती वेगाने पुढे जाईल

Web Title: Lokmat Parliamentary Awards 2018 : Sharad Pawar should have known this while criticizing on Sonia, Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.