संसद सुरक्षेवरुन गदारोळ; अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ विरोधी खासदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 03:38 PM2023-12-18T15:38:58+5:302023-12-18T15:39:41+5:30

लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेतून  निलंबित केले.

Lok Sabha suspends 34 opposition members, including Congress leader Adhir Ranjan Chowdhury | संसद सुरक्षेवरुन गदारोळ; अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ विरोधी खासदार निलंबित

संसद सुरक्षेवरुन गदारोळ; अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ विरोधी खासदार निलंबित

नवी दिल्ली :  संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत सोमवारी सुद्धा विरोधी पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. दरम्यान, लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेतून  निलंबित केले.

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत अपूर्वा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमती, के नवासकानी, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॉय, शताब्दी रॉय, असिथ कुमार मल, कौशलेंद्र कुमार, अँटोनी कुमार, एस एस पलनामनिक्कम, तिरुवरुस्कर, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस रामा लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई आणि टीआर बालू यांना निलंबित करण्यात आले.

सभागृहातील गदारोळामुळे वरील ३० खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तर विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत के जयकुमार, विजय वसंत आणि अब्दुल खालिक यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, विरोधी पक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन देण्याची मागणी सातत्याने करत आहेत.

याआधीही लोकसभेतील १२ विरोधी खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेसचे टीएन प्रतापन, हिबी इडेन, जोतिमणि, रम्या हरिदास, डीन कुरियाकोसे, व्हीके श्रीकंदन, बेनी बेहानन, मोहम्मद जावेद आणि मणिकम टागोर यांचा समावेश आहे. द्रमुकच्या कनिमोळी, सीपीआय(एम)चे एस वेक्शन आणि सीपीआयचे के. हे सुब्बारायन आहे. तर टीएमसी सदस्य डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

काय म्हणाले अधीर रंजन चौधरी?
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह टीव्हीवर जे निवेदन देत आहेत, ते सभागृहात त्यांनी द्यावे, अशी आमची इच्छा आहे. याशिवाय, संसदेच्या सुरक्षेसाठी सरकार आणखी कोणती पावले उचलणार, हे देशाला आणि आम्हाला सांगावे, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले. 

Web Title: Lok Sabha suspends 34 opposition members, including Congress leader Adhir Ranjan Chowdhury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.