राजकीय पक्षांकडून सैनिकांचे श्रेय घेणे थांबवा, माजी सेनाप्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 11:48 AM2019-04-12T11:48:02+5:302019-04-12T13:44:48+5:30

राजकीय पक्षांकडून सैनिकांचा होणारा राजकीय वापर थांबवण्याची मागणी तीनही सेनेच्या ८ माजी सेनाप्रमुख व १५० पेक्षा जास्त माजी सैन्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून कळवले आहे.

lok sabha election 2019 Stop the credit of soldiers from the political parties | राजकीय पक्षांकडून सैनिकांचे श्रेय घेणे थांबवा, माजी सेनाप्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र

राजकीय पक्षांकडून सैनिकांचे श्रेय घेणे थांबवा, माजी सेनाप्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान गुरुवारी पार पडले. पुढील टप्यातील निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मोदी सरकार सैन्यदलाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचे आरोप विरोधकांनी केले असल्याने निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे. भाजपकजून भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असतानाच, माजी सेना प्रमुखासह निवृत्त अधिकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रपती यांना पत्र लिहले आहे.

पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी आपले मत पुलवमा हल्ल्यात शहिदांच्या समर्थनात करावे असे विधान लातूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केल्याने त्यांच्यावर चोहीबाजूने टीका होत आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात सैनिकांचा उल्लेख करण्यास सुरुवात केली.  भाजपच्या 'मै भी चौकीदार" या गीतात सुद्धा सैनिक दाखवण्यात आले होते, याविषयी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केली होती, यावरून भाजपला निवडणूक आयोगाने खुलासा मागितला आहे. 

मोदी सरकार सर्जिकल स्ट्राइक वरून श्रेय घेत असून भारतीय सेना ही मोदींची सेना असल्याचे दाखवले जात आहे. राजकीय पक्षांकडून सैनिकांचा होणारा राजकीय वापर थांबवण्याची मागणी तीनही सेनेच्या ८ माजी सेनाप्रमुख व १५० पेक्षा जास्त माजी सैन्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून कळवले आहे.

निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षांने सैनिकांचे वापर करू नयेत असे निवडणुक आयोगाने आधीच स्पष्ट केले असताना सुद्धा भाजपकडून सैनिकाच्या श्रेय घेण्याच्या प्रयत्न होत असल्याचे आरोप केला आहे. याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असल्याने भाजपची अडचण वाढू शकते.

Web Title: lok sabha election 2019 Stop the credit of soldiers from the political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.