Lok Sabha Election 2019 : स्वत:ची कार नसणाऱ्या ओवेसींकडे पिस्तुल अन् रायफल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 02:29 PM2019-03-19T14:29:32+5:302019-03-19T14:30:14+5:30

उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात असुदोद्दीन ओवेसी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे १३ कोटी ३० लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

Lok Sabha Election 2019: owaisi have Pistal and rifle | Lok Sabha Election 2019 : स्वत:ची कार नसणाऱ्या ओवेसींकडे पिस्तुल अन् रायफल

Lok Sabha Election 2019 : स्वत:ची कार नसणाऱ्या ओवेसींकडे पिस्तुल अन् रायफल

googlenewsNext

हैदराबाद - एआयएमआयएमचे प्रमुख असुदोद्दीन ओवेसी हैदराबाद लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ओवेसी यांनी दिलेल्या घोषणापत्रानुसार त्यांच्याकडे १३ कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात ओवेसी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे १३ कोटी ३० लाखांची स्थावर मालमत्ता असून त्यांच्यावर नऊ कोटी ३० लाखांचे कर्ज आहे.

ओवेसी यांच्याकडे दोन लाख रुपये रोख असून २०१७-१८ मध्ये त्यांचे उत्पन्न १०,०१,०८० रुपये एवढे होती. तर २०१६-१७ मध्ये त्यांचे उत्पन्न १३,३३,२५० रुपये होते. तसेच त्यांच्याविरुद्ध पाच गुन्हे असून एकही गुन्ह्यात त्यांना अद्याप दोषी ठरविण्यात आलेले नाही.

ओवेसी यांनी हैदराबाद मतदार संघातून विजयाची हॅटट्रिक केली असून त्यांनी आता चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून येण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. हैदराबाद लोकसभा मतदार संघ तब्बल तीन दशकांपासून एमआयएमचा गड आहे. त्यांचे वडील सुल्तान सलाहुद्दीन ओवेसी यांनी देखील या लोकसभा मतदार संघाचे सलग सहा वेळा प्रतिनिधत्व केले आहे.

उमेदवारी अर्ज सादर करताना दिलेल्या शपथपत्रात ओवेसी यांनी आपल्याकडे स्वत:ची कार नसल्याचे नमूद केले आहे. परंतु आपल्याकडे एनपी बोर २२ पिस्तुल आणि एक रायफल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दोन्हींची किंमत प्रत्येकी एक लाख रुपये आहे.

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019: owaisi have Pistal and rifle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.