'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 10:34 AM2019-05-06T10:34:52+5:302019-05-06T10:37:31+5:30

युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

lok sabha election 2019 akhilesh yadav on Congress | 'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर'

'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर'

नवी दिल्ली - समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करण्यासाठी इच्छूक होते. मात्र मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसडमधील विधानसभा निवडणुकीतील विजयोत्सवात काँग्रेस लोकसभा निवडणुकीत 'सप-बसप'सोबत युती करण्यास उत्सुकता दाखवली नसल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत ते बोलत होते.

युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याच कालावधीत काँग्रेसने तीन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर युतीची चर्चा बारगळली, असं अखिलेश यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदार संघात सपा-बसपाने उमेदवार दिले नाही, याचा अर्थ असा नाही की, आपण काँग्रेससाठी सॉफ्ट आहोत. मायावती आणि आपण मिळून हा निर्णय घेतला होता. दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. परंतु, भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक नसल्याचे अखिलेश यांनी नमूद केले. तसेच दोन्ही पक्षांच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशाची स्थिती खराब झाल्याचे टीका देखील यावेळी त्यांनी केली.

दरम्यान उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून विजयी होतील अशाच लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. जे उमेदवार निवडून येणार नाहीत, ते उमेदवार भाजपच्या मतांचे विभाजन करण्यासाठी असल्याचे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी म्हटले होते. त्यावर अखिलेश म्हणाले की, प्रियंका खुद्द गोंधळलेल्या आहेत.

 

Web Title: lok sabha election 2019 akhilesh yadav on Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.