'आप'ला धक्का; आठवड्याभरात दुसरा आमदार भाजपमध्ये सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 04:53 PM2019-05-06T16:53:31+5:302019-05-06T16:53:52+5:30

केंद्रीयमंत्री विजय गोयल आणि भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी सहरावत यांना भाजपचे सदस्यत्व प्रदान केले. एका आठवड्यात 'आप' सोडणारे सहरावत तिसरे आमदार ठरले आहे.

Lok Sabha Election 2019 aap mla devinder sehrawat joins bjp | 'आप'ला धक्का; आठवड्याभरात दुसरा आमदार भाजपमध्ये सामील

'आप'ला धक्का; आठवड्याभरात दुसरा आमदार भाजपमध्ये सामील

Next

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. परंतु, प्रचाराची धामधूम सुरू असताना आम आदमी पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. दिल्लीतील बिजवासन मतदार संघातील आमदार देवेंद्र सहरावत आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सामील झाले.

केंद्रीयमंत्री विजय गोयल आणि भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी सहरावत यांना भाजपचे सदस्यत्व प्रदान केले. एका आठवड्यात 'आप' सोडणारे सहरावत तिसरे आमदार ठरले आहे. याआधी गांधीनगरचे आमदार अनिल वाजपेयी भाजपमध्ये सामील झाले होते. वाजपेयी यांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आणि विजय गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर ४ मे रोजी पंजाबमधील अमरजीत सिंह संदोहा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

काही दिवसांपूर्वीच भाजपकडून दावा करण्यात आला होता की, 'आप'चे सात आमदार आमच्या संपर्कात आहेत. तर भाजपकडून आमचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप 'आप'कडून करण्यात आला आहे. एवढेच नाही तर राफेल खरेदी घोटाळ्यातील पैसा मोदी सरकार 'आप'चे आमदार खरेदी करण्यासाठी वापरत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप' प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला होता. दरम्यान ऐन निवडणुकीच्या काळात आप आमदार पक्ष सोडत असल्यामुळे केजरावाल यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच काँग्रेस आणि आपची युती फिस्कटली आहे. मात्र याचा फायदा नेमका कुणाला होणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019 aap mla devinder sehrawat joins bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.