लोकसभेची तयारी सुरू; भाजप, विरोधक आणि निवडणूक आयोगाने कंबर कसली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 05:32 AM2023-06-10T05:32:04+5:302023-06-10T05:34:32+5:30

मे २०२४मध्ये च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, विरोधक आणि निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

lok sabha 2024 election preparations begin bjp and opposition and the election Commission tighten their belts | लोकसभेची तयारी सुरू; भाजप, विरोधक आणि निवडणूक आयोगाने कंबर कसली

लोकसभेची तयारी सुरू; भाजप, विरोधक आणि निवडणूक आयोगाने कंबर कसली

googlenewsNext

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर सामना करण्यासाठी १५ पेक्षा अधिक विरोधी पक्षांच्या पाटण्यातील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनी यापूर्वीही अशा बैठका दिल्ली व कोलकाता येथे घेतलेल्या असल्या तरी पाटणा येथील बैठकीत प्रथमच समान रणनीती तयार करण्यात येणार आहे. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले की, अनेक लोकसभा मतदारसंघांत विरोधकांचा एकच उमेदवार देण्याबरोबरच किमान समान कार्यक्रमावरही पाटण्यातील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

मे २०२४मध्ये च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, विरोधक आणि निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजपने दिल्लीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली आहे. विरोधकांनीही भाजपविरोधात एकच उमेदवार देण्यास रणनीती ठरवण्यासाठी पाटणा येथे बैठक आयोजित केली आहे, तर निवडणूक आयोगाने मतदान यंत्रे, ‘व्हीव्हीपॅट’ची तपासणी सुरू केली आहे.

अजेंड्यावर बारकाईने काम

नितीशकुमार हे बैठकीच्या अजेंड्यावर बारकाईने काम करीत आहेत व विरोधी पक्षांच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या नियमित संपर्कात आहेत. जनता दल (एस), बीआरएस, बाजेडी, वायएसआर-काँग्रेस आणि बसपा या बैठकीला आपापल्या राजकीय भूमिकांमुळे उपस्थित राहणार नाहीत. दिल्ली आणि पंजाबमध्ये लोकसभेच्या जागावाटपात काँग्रेसला समायोजित करणे आम आदमी पार्टीला कठीण जाणार असले व काँग्रेसला इतर राज्यांमध्ये जागा देण्यास जागा देणे अवघड जाणार असले तरी दोघेही समान रणनीती तयार करण्यास इच्छुक आहेत.

अमित शाह, जे.पी. नड्डा यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

दिल्लीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक ११, १२ जून रोजी होणार आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा होऊ शकते. सूत्रांचे म्हणणे आहे की सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नावीन्यपूर्ण कल्पना आणण्यास सांगितल्या आहेत. निवडणूक राज्यांचीही स्वतंत्र बैठक होणार आहे.

देशभर जनसंपर्क अभियान

मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने ३० मे ते ३० जून या कालावधीत देशभर जनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान पक्ष ५० हून अधिक मोठ्या जाहीरसभा घेणार आहे. यापैकी अर्धा डझनहून अधिक सभांना पंतप्रधान संबोधित करणार आहेत. गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री या जनसंपर्क अभियानात सहभागी होणार आहेत.

आयोगाकडून ‘ईव्हीएम’ची तपासणी

- २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पाच विधानसभा निवडणुकांच्या आधी, निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने देशभरातील मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणेची प्राथमिक स्तरावरील तपासणी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

- “मॉक पोल” हा प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. हा संपूर्ण भारताचा सराव आहे. केरळच्या सर्व मतदारसंघांसह टप्प्याटप्प्याने देशभरात हा सराव होणार आहे,” असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले.. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दोन्ही मशीन तपासण्यासाठी मॉक पोलही घेतला जातो. 

- राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये तसेच पोटनिवडणुका लागलेल्या विधानसभा आणि लोकसभा जागांवरदेखील ‘मॉक पोल’ होणार आहे.


 

Web Title: lok sabha 2024 election preparations begin bjp and opposition and the election Commission tighten their belts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.