कमी मतदानामुळे भाजपची काळजी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 04:43 AM2019-05-23T04:43:05+5:302019-05-23T04:48:12+5:30

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करणाऱ्यांनी भलेही भाजपच्या पारड्यात मोठा विजय टाकला असला तरी ५४२ लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची आकडेवारी हे दाखवते की २२७ मतदारसंघांत कमी मतदान झाले आहे

With less voting the BJP's tension increased | कमी मतदानामुळे भाजपची काळजी वाढली

कमी मतदानामुळे भाजपची काळजी वाढली

Next

हरिश गुप्ता/नितीन अग्रवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभेसाठीच्या २०१४च्या निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपला यंदा मात्र काळजीने ग्रासले आहे. कारण भाजपचे प्राबल्य असलेल्या भागांत देशभर कमी मतदान झाले आहे. त्यामुळे निवडणूक निकालापूर्वी भाजपची काळजी वाढली आहे.


लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करणाऱ्यांनी भलेही भाजपच्या पारड्यात मोठा विजय टाकला असला तरी ५४२ लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची आकडेवारी हे दाखवते की २२७ मतदारसंघांत कमी मतदान झाले आहे तर ३१५ मतदारसंघांत मतदान २०१४ मधील मतदानापेक्षा जास्त झाले आहे. २०१४ मध्ये भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या आणि त्यापैकी ९८ जागांवर कमी किंवा खूप कमी मतदान झाले होते. २०१४ मध्ये भाजपने १८४ लोकसभा जागा जिंकल्या होत्या तेथे खूपच जास्त मतदान झाले होते. ९८ मतदारसंघांत कमी मतदान झाले होते. त्यापैकी ३१ मतदारसंघ नागरी तर ६७ मतदारसंघ ग्रामीण भागांतील होते. भाजपचे प्राबल्य असलेल्या भागांत देशभर कमी मतदान झाले याची काळजी निवडणुकीच्या निकालांचे अंदाज व्यक्त करणाऱ्यांना आहे. त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३३०-३६९ जागा जिंकेल असे भाकीत केले आहे. परंतु, कमी मतदानाचा लाभ कोणत्या पक्षाला मिळेल याची उत्तरे हे अंदाज व्यक्त करणाºयांकडे नाहीत.


याबाबत प्रश्न विचारल्यावर इंडिया टुडे अ‍ॅक्सिसचे निवडणूक भाकीत व्यक्त करणारे प्रदीप गुप्ता यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कमी मतदानाचा अर्थ हा सत्ताधारी उमेदवार/सरकार यांच्यासाठी दुबळेपणा असा होतो. याच गुप्ता यांनी रालोआला ३३०-३६५ जागा मिळतील, असे म्हटलेले आहे. याचा अर्थ असा की, मोठ्या संख्येतील मतदारांत विद्यमान उमेदवाराला मतदान करण्याचा उत्साह नव्हता. परंतु याचा अर्थ असाही नाही की जे लोक मतदानासाठी आले त्यांनी विद्यमान उमेदवाराला मत दिले नाही, असेही ते म्हणाले. २०१४ मध्ये भाजपने उत्तर प्रदेशात ७१ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ३० जागांवर कमी मतदान झाले होते. महाराष्ट्रात नऊ ठिकाणी कमी तर १४ ठिकाणी जास्त मतदान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेत नऊ लोकसभा मतदारसंघांत कमी तर १७ मतदारसंघांत जास्त मतदान झाले होते. २०१४ मध्ये झारखंडमध्ये भाजपने १० जागा जिंकल्या होत्या व त्यापैकी नऊ मतदारसंघात कमी मतदान झाले होते. २०१४ मध्ये आग्रा आणि पाटणा साहिब मतदारसंघांत भाजपने विजय मिळवला होता. तेथे अनुक्रमे २३ ते १७ टक्के मतदान झाले होते.

पटणा साहिबमध्ये चिंता!
२०१९ च्या निवडणुकीत पाटणा साहिब मतदारसंघात काँग्रेसतर्फे शत्रुघ्न सिन्हा हे भाजपच्या रविशंकर प्रसाद यांच्याविरुद्ध लढले असून तेथील कमी मतदानाने भाजपची काळजी वाढवली आहे.

Web Title: With less voting the BJP's tension increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.