Fifa World Cup 2018 : फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या किरण बेदी ट्विटरवर झाल्या ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 09:29 AM2018-07-16T09:29:29+5:302018-07-16T09:33:26+5:30

फिफा विश्वचषकाला दुसऱ्यांदा गवसणी घालणाऱ्या फ्रान्सच्या संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. मात्र ऐतिहासिक संदर्भ देत फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी ट्विटरवर ट्रोल होत आहे.

Kiran Bedi trolled on Twitter | Fifa World Cup 2018 : फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या किरण बेदी ट्विटरवर झाल्या ट्रोल

Fifa World Cup 2018 : फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या किरण बेदी ट्विटरवर झाल्या ट्रोल

Next

नवी दिल्ली - फिफा विश्वचषकाला दुसऱ्यांदा गवसणी घालणाऱ्या फ्रान्सच्या संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. भारतातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही फ्रेंच संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र ऐतिहासिक संदर्भ देत फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी ट्विटरवर ट्रोल होत आहे.

त्याचे झाले असे की, इतरांप्रमाणेच किरण बेदी यांनीही फ्रान्सचे अभिनंदन करणारे ट्विट केले. मात्र या ट्विटमध्ये त्यांनी पुदुच्चेरीमध्ये एकेकाळी असलेल्या फ्रेंच वसाहतीचा उल्लेख करत पुदुच्चेरीच्या जनतेलाही शुभेच्छा दिल्या.  आम्ही पुदुच्चेरीच्या रहिवाशांनी (जे पूर्वी फ्रेंच वसाहतीचा भाग होते) विश्वचषक जिंकला आहे. अभिनंदन मित्रांनो. फ्रान्सचा संघ मिश्रित होता. खेळ हा सर्वांना जोडण्याचे काम करतो, असे ट्विट बेदी यांनी केले. मात्र हे ट्विट नेटीझन्सना फारसे रुचले नाही. त्यांनी बेदी यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. 





 एका ट्विटर युझरने लिहिले की मॅडम आम्ही सारे भारतीय आहोत. तुम्ही तुमचे हे पब्लिसिटी स्टंट थांबवण्याची गरज आहे. 




  

Web Title: Kiran Bedi trolled on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.