मानहानीप्रकरणी केजरीवाल तुरुंगात

By Admin | Published: May 21, 2014 04:19 PM2014-05-21T16:19:35+5:302014-05-21T16:20:31+5:30

नितीन गडकरी यांची बदनामी केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील न्यायालयाने दोन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत धाडले आहे.

Kejriwal detained in defamation case | मानहानीप्रकरणी केजरीवाल तुरुंगात

मानहानीप्रकरणी केजरीवाल तुरुंगात

googlenewsNext

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २१ - नितीन गडकरी यांची बदनामी केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील न्यायालयाने दोन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत धाडले आहे. केजरीवाल यांनी जामीन नाकाल्यावर न्यायालयाने त्यांना कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. 
जानेवारीमध्ये आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरी देशातील भ्रष्टाचारी नेते असल्याचे म्हटले होते. केजरीवालांच्या या विधानानंतर फेब्रुवारीमध्ये गडकरींनी केजरीवालांविरोधात दिल्ली कोर्टात फौजदारी याचिका दाखल केली होती. केजरीवाल यांनी प्रतिमा मलिन केल्याचे गडकरींचा दावा केला होता. या मानहानीप्रकरणाची आज कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीसाठी केजरीवाल कोर्टात हजर होते. कोर्टाने केजरीवाल यांना १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र केजरीवाल यांनी जामीन नाकारला. 'मी काही चुकीचे कृत्य केले नसल्याने मी जामीन घेणार नाही. मी तुरुंगात जायला तयार आहे' असे केजरीवाल यांच्यावतीने कोर्टाला सांगण्यात आले. यानंतर कोर्टाने त्यांना दोन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. 'तुम्ही आम आदमी पक्षाचे प्रतिनिधीत्व करत असून तुम्ही 'आम आदमी'प्रमाणेच वर्तन करायला पाहिजे. तुम्हाला जामीन घेण्यात काही समस्या आहे का ? असा सवालही कोर्टाने केजरीवाल यांना विचारला. 

Web Title: Kejriwal detained in defamation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.