नरेंद्र मोदी vs मनमोहनसिंग सरकार; कोणाच्या काळात किती जणांना मिळाला भारतरत्न? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 04:43 PM2024-01-24T16:43:27+5:302024-01-24T16:45:36+5:30

मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे.

Karpuri Thakur BharatRatna: modi-government-vs-manmohan-government-under-whose-rule-most-bharat-ratna-awarde-given | नरेंद्र मोदी vs मनमोहनसिंग सरकार; कोणाच्या काळात किती जणांना मिळाला भारतरत्न? पाहा...

नरेंद्र मोदी vs मनमोहनसिंग सरकार; कोणाच्या काळात किती जणांना मिळाला भारतरत्न? पाहा...

Karpuri Thakur BharatRatna: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर  समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना केंद्र सरकारने भारतरत्न (मरणोत्तर) पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. अशातच, मोदी सरकार आणि मनमोहन सरकार यांच्या कार्यकाळात सर्वाधिक भारतरत्न कोणाला मिळाले, याची चर्चा सुरू झाली. 

2024 साली मोदी सरकार सत्तेवर आले आणि त्याच वर्षी देशातील दोन व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला. क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव म्हणजेच सीएनआर राव यांना मोदी सरकारच्या काळात भारतरत्न देण्यात आला, पण त्यांच्या नावांची घोषणा मोदी सरकारच्या स्थापनेपूर्वी फेब्रुवारीमध्येच झाली होती.

मनमोहन सिंग सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात (2004-2014) केवळ 3 जणांना भारतरत्न देण्यात आला. यामध्ये पंडित भीमसेन जोशी (2008), सचिन तेंडुलकर (2014) आणि सीएनआर राव (2014) यांचा समावेश आहे. तर, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात 6 व्यक्तींना भारतरत्न देऊन सन्मानित केले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून सुरुवात
मोदी सरकारच्या काळात 2015 मध्ये पहिल्यांदा भारतरत्न जाहीर झाला होता. मोदी सरकारने अनेक वर्षांपासूनची मागणी मंजूर करून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना हा सन्मान दिला. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा गौरव केला होता. त्याच वर्षी स्वातंत्र्यसेनानी आणि हिंदू महासभेचे नेते महामानव मदन मोहन मालवीय यांनाही भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती.

प्रणव मुखर्जी यांनाही भारतरत्न 
2019 मध्ये मोदी सरकारने भारतरत्नसाठी 3 नावांची घोषणा केली. यामध्ये प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांचा समावेश होता. या तीन नावांमध्ये सर्वाधिक चर्चा होती ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची. याबाबत काँग्रेसची भूमिका काय असेल, अशी चर्चा होती, मात्र पक्षाने निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली. प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले. पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या आणि आपल्या जीवनात आत्मसात करणाऱ्या अशा व्यक्तीच्या सेवांचा गौरव करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले.

कर्पूरी ठाकूर अन् मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक
मंगळवारी मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्याची घोषणा केली. मोदी सरकारच्या या पावलाला मास्टर स्ट्रोक म्हटले जात आहे. या निर्णयातून मोदी सरकारने बिहारमधील मागास समाजाला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येईल, असे बोलले जात आहे.

काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले
मोदी सरकारच्या नुकत्याच झालेल्या घोषणेनंतर पुन्हा एकदा काँग्रेसवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, आम्ही अनेक दिवसांपासून ही मागणी करत आहोत. काँग्रेसही सत्तेत आहे. इतर लोकही सत्तेत राहिले, पण भारतरत्न दिला गेला नाही.

Web Title: Karpuri Thakur BharatRatna: modi-government-vs-manmohan-government-under-whose-rule-most-bharat-ratna-awarde-given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.