...जेंव्हा मुख्यमंत्री सरकारी शाळेतील फर्शीवर चादर टाकून झोपतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:05 PM2019-06-22T16:05:49+5:302019-06-22T17:00:38+5:30

कुमारस्वामी सध्या 'व्हिलेज स्टे प्रोग्राम'अंतर्गत राज्यातील गावांचा दौरा करत आहेत शुक्रवारी ते कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील हेरुर गावात दाखल झाले होते.

karnataka cm hd kumaraswamy is staying in the village as a part of his village stay programme | ...जेंव्हा मुख्यमंत्री सरकारी शाळेतील फर्शीवर चादर टाकून झोपतात

...जेंव्हा मुख्यमंत्री सरकारी शाळेतील फर्शीवर चादर टाकून झोपतात

googlenewsNext

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्यातील आघाडीत बिघाडी झाल्याचे वृत्त नेहमीच येते. त्यामुळे कर्नाटकच्या राजकीय घडामोडी चांगल्याच चर्चेत असतात. आता मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. त्यांच्या एक कृतीमुळे ते सोशल मीडियावर दिसत आहेत.

कुमारस्वामी सध्या 'व्हिलेज स्टे प्रोग्राम'अंतर्गत राज्यातील गावांचा दौरा करत आहेत शुक्रवारी ते कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील हेरुर गावात दाखल झाले होते. त्याचवेळी या भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपला कार्यक्रम स्थगीत करावा लागला. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांना चंदकी गावातील यादगीर या सरकारी शाळेत थांबावण्यात आले होते.

यावेळी कुमारस्वामी शाळेच्या वर्गातील फर्शीवर पांढरी चादर टाकून झोपी गेल्याचे समोर आले. कुमारस्वामी यांच्या या साधेपणाची सगळीकडे चर्चा होत आहे. येथील कार्यक्रमात ते म्हणाले होते की, मी गावांचा दौरा करण्यासाठी साध्या बसने प्रवास करत असून आपल्याला कुणाकडून काहीही शिकायची गरज नाही. आपण झोपडीसह पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील राहिलेलो आहोत, असही कुमारस्वामी म्हणाले.

Web Title: karnataka cm hd kumaraswamy is staying in the village as a part of his village stay programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.