कलमाडींनी IOAचे मानद आजीवन अध्यक्षपद नाकारले

By admin | Published: December 28, 2016 05:06 PM2016-12-28T17:06:35+5:302016-12-28T19:18:05+5:30

वादग्रस्त क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आजीवन मानद अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Kalmadi has refused to accept the honorary lifetime of the IOA | कलमाडींनी IOAचे मानद आजीवन अध्यक्षपद नाकारले

कलमाडींनी IOAचे मानद आजीवन अध्यक्षपद नाकारले

Next
ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 28 - वादग्रस्त क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आजीवन मानद अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपी असलेल्या कलमाडी यांची संघटनेच्या आजीवन मानद अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निर्णयावर चौफेर टीका होऊ लागली होती. त्यामुळे कलमाडी यांनी पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले आहे. 
सध्याच्या परिस्थितीत हे पद स्वीकारणे योग्य नाही, असे सांगत कलमाडींनी पद स्वीकारण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. काल चेन्नईत झालेल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सर्वसाधारण सभेत कलमाडी यांची संघटनेच्या आजीवन मानद अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आल्यानंतर क्रीडाक्षेत्रातून या निर्णयाविरोधात तीव्र पडसाद उमटले होते. तसेच केंद्रीय क्रीडमंत्री विजय गोयल यांनीही कलमाडी आणि अभय चौटाला यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच या दोघांनाही पदावरून  न हटवल्यास भारतीय ऑलिम्पिक संघटनेशी असलेले संबंध संपवण्याचा इशारा गोयल यांनी दिला आहे. 

Web Title: Kalmadi has refused to accept the honorary lifetime of the IOA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.