पारदर्शकतेसाठी कलामांनी केली इ निवडणूकीची शिफारस

By admin | Published: July 8, 2014 06:58 PM2014-07-08T18:58:54+5:302014-07-08T18:58:54+5:30

कल्पना करा, मतदारांच्या हाती स्मार्ट फोन आहे आणि मतदान करण्यासाठी चांगल्या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून मतदार नाव नोंदणी करत आहेत

Kalam recommended transparency in the election | पारदर्शकतेसाठी कलामांनी केली इ निवडणूकीची शिफारस

पारदर्शकतेसाठी कलामांनी केली इ निवडणूकीची शिफारस

Next

ऑनलाइन टीम
नवी दल्ली, दि. ८ - कल्पना करा, मतदारांच्या हाती स्मार्ट फोन आहे आणि मतदान करण्यासाठी चांगल्या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून मतदार नाव नोंदणी करत आहेत. तसेच आपल्या विभागातील नेत्यांना मतदान करत आहेत. ही कल्पना आहे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची, त्यांनी आपल्या 'अ मेनिफेस्टो फॉर चेंज' या पुस्तकात ही कल्पना मांडली आहे. मतदारांनी आपल्या मतदार संघासाठी नोंदणी केली असता तात्काळ निवडणूक आयोगचे अधिकारी नोंदणी करणा-या मतदाराची खातरजमा करतील. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता, शिक्षण, भारतीय नागरिकत्व , व्यावसाय इत्यादी गोष्टी तपासण्यात येतील. तसेच बँकेतील तपशील आणि न्यायपालिकेतील त्याव्यक्ती बद्दल असलेले खटले याबद्दल तात्काळ माहिती मिळणार आहे. या सर्व बाबी क्षणार्धातच निवडणूक आयोगाच्या संगणकावर दिसणार असतील. असं कलाम यांनी सांगताच त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. नेते मंडळी हे बदल स्विकारतील का, नोकरशहा हे आमलात आणतील का, त्यावर त्यांनी उत्तर दिले की, जसजसा तंत्रज्ञानाचा वापर वाढत जाईल तसतसे या गोष्टींचा वापर अनिर्वार्य असणार आहे.
हे पुस्तक म्हणजे मिशन २०-२० या पुस्तकाची मालिका आहे. कलाम हे पुस्तक व्ही. पोनराज यांच्यासह लिहीत आहेत. हार्पर कॉलीन इंडीया या पुस्तकाचे प्रकाशन करणार असून या पुस्तकात कलाम यांनी संसदीय कामकाजाचे संशोधन केले आहे. तसेच सध्या असणा-या लोकपाल बिलाहून वेगळं लोकपाल, केंद्रीय दक्षता आयोग,सीबीआय यांना स्वातंत्र्य असाण्याबद्दल कलाम यांनी लिहलं आहे.

Web Title: Kalam recommended transparency in the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.