भारताचे चारही टोक गाठले अवघ्या २६ दिवसात डॉ. सुनीलदत्त चौधरी यांच्या प्रवासाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नांेद

By admin | Published: April 28, 2016 12:33 AM2016-04-28T00:33:08+5:302016-04-28T00:33:08+5:30

प्रवासाची आवड असल्याने वेगळे काहीतरी करायचे या उद्देशाने वयाच्या ६२ व्या वर्षी जळगाव येथील डॉ. सुनीलदत्त चौधरी यांनी स्वत:च्या चारचाकी वाहनाने भारताच्या चारही दिशांच्या टोकांपर्यंतचा सुमारे १३ हजार ८३४ किमीचा प्रवास अवघ्या २६ दिवसात पार करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत झेप घेतली आहे.

In just 26 days, India's four corners reached Dr. Nanded in Limca Book of Records for Suniladutt Chaudhary's Journey | भारताचे चारही टोक गाठले अवघ्या २६ दिवसात डॉ. सुनीलदत्त चौधरी यांच्या प्रवासाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नांेद

भारताचे चारही टोक गाठले अवघ्या २६ दिवसात डॉ. सुनीलदत्त चौधरी यांच्या प्रवासाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नांेद

Next
रवासाची आवड असल्याने वेगळे काहीतरी करायचे या उद्देशाने वयाच्या ६२ व्या वर्षी जळगाव येथील डॉ. सुनीलदत्त चौधरी यांनी स्वत:च्या चारचाकी वाहनाने भारताच्या चारही दिशांच्या टोकांपर्यंतचा सुमारे १३ हजार ८३४ किमीचा प्रवास अवघ्या २६ दिवसात पार करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत झेप घेतली आहे.
डॉ. सुनीलदत्त चौधरी यांचे टागोर नगरात जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या मागे होमिओपॅथी क्लिनीक आहे. त्यांना प्रवासाचा फार छंद आहे. काहीतरी जगावेगळे करावे या विचाराने डॉ. चौधरी हे आपल्या मारुती कारने कन्याकुमारीहून ३० ऑक्टोंबर २०१४ रोजी सकाळी १०.१५ मिनीटांनी प्रवासास निघाले. अरुणाचल प्रदेशातील तेजू या टोकाला ते ८ नोव्हेंबर २०१४ ला पोहचले. आणि त्यानंतर प्रवास सुरू ठेवून जम्मू काश्मीर मधील लेह येथे १६ नोव्हेंबर २०१४ ला पोहचले. लेह पासून प्रवास सुरू करून गुजरातच्या कोटेश्वर टोकापर्यंत ते २२ नोव्हंेबर २०१४ ला पोहचले आणि त्यानंतर पुन्हा आपल्या प्रवासाचा आणि उद्दीष्टाचा शेवट करीत कन्याकुमारीला २६ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी ८.३० वाजता पोहचले.
असा त्यांनी भारताच्या चारही टोकांपर्यंतचा १३ हजार ८३४ किमीचा प्रवास ६४७ तास १५ मिनीटांनी म्हणजेच २६ दिवस २२ तास आणि १५ मिनीटांनी पार केला.
त्यांच्या या थक्क करणार्‍या साहसाचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेत त्यांच्या प्रवासाची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: In just 26 days, India's four corners reached Dr. Nanded in Limca Book of Records for Suniladutt Chaudhary's Journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.