जूनमध्ये इस्रो एकाचवेळी २२ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार

By admin | Published: May 29, 2016 02:37 PM2016-05-29T14:37:08+5:302016-05-29T16:53:32+5:30

एकाच वेळी एक दोन नव्हे तर तब्बल २२ उपग्रहांचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था जून महिन्यात करणार आहे. नुकत्याच झालेल्या रियुझेबल लाँच व्हेकल च्या यशस्वी उड्डाणचाचणीनंतर

In June, ISRO will launch 22 satellites simultaneously | जूनमध्ये इस्रो एकाचवेळी २२ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार

जूनमध्ये इस्रो एकाचवेळी २२ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार

Next
>ऑनलाइन लोकमत
बेंगळूरू, दि. २९ : एकाच वेळी एक दोन नव्हे तर तब्बल २२ उपग्रहांचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जून महिन्यात करणार आहे. नुकत्याच झालेल्या 'रियुझेबल लाँच व्हेकल (आर.एल.वी.)'च्या यशस्वी उड्डाणचाचणीनंतर पुढील कामगिरीवर आमच लक्ष केंद्रित राहणार आहे, या व्यतिरिक्त पुढील महिन्यात २२ उपग्रहांचे प्रक्षेपणही आम करणार आहोत. यामध्ये नकाशाशास्त्रीय उपग्रहांच्या मालिकेतील एका उपग्रहाचा समावेश आहे. असे इस्रो चे अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितले. फेडरेशन ऑफ कर्नाटका चेम्बर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री (एफ.के.सी.सी.एल.)ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पत्रकारांची बोलताना हा कार्यक्रम जून महिन्याच्या शेवटी घेण्यात येणार असून यात २२ पैकी ३ उपग्रह हे भारतीय बनावटीचे असून उर्वरित १९ व्यावसायिक असल्याची माहिती त्यांनी दिली. 
 
यापूर्वी, विक्रम साराभाई स्पेस सेंटर चे अध्यक्ष के. सिवन यांनी इस्रोचे वर्कहॉर्स पोलर रॉकेट पी.एस.एल.वी सी.३४ हे प्रक्षेपणासाठी वापरण्यात येईल म्हटले होते; ज्यात भारताबरोबरच अमेरिका, कॅनडा, इंडोनेशिया आणि जर्मनीचे उपग्रह असतील. याआधी या अंतराळ संस्थेने एकावेळी १० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण २००८ मध्ये केले होते. किरण कुमार इस्रोच्या पुढील प्रक्षेपणांची माहिती देताना म्हणाले, यानंतर लगेचच स्कॅटरामीटरचे प्रक्षेपण होईल आणि मग आयएनसएटी ३डीआर या तापमान आणि आद्रता यांची माहिती देण्याऱ्या भूस्थिर उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला जाईल. 
 
दरम्यान, इस्रोने सोमवारी 'रियुझेबल लाँच व्हेकल (आर.एल.वी.) स्वदेशी' चे श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथुन यशस्वी उड्डाणचाचणी करून 'रियुझेबल रॉकेट' जेअवकाश प्रवेशासाठी लागणाऱ्या खर्चात मोठ्याप्रमाणावर कपात करेल अशा प्रकारात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
 

Web Title: In June, ISRO will launch 22 satellites simultaneously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.