Janmashtami 2018: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 12:10 PM2018-08-30T12:10:35+5:302018-08-30T12:11:46+5:30

Janmashtami 2018: श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

Janmashtami 2018: Date and time, shubh muhurt, significance and history of Krishna Janmashtami | Janmashtami 2018: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Janmashtami 2018: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Next

नवी दिल्ली : जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. यावेळी जन्माष्टमी २ सप्टेंबरला जाणारी होणार आहे. 

हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

रासलीला चित्र

मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात.वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो. याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्वाची संकल्पना रासलीला हिचे सादरीकरण केले जाते.

अष्टमी सुरुवात :

यावेळी अष्टमी २ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजून ४७ मिनिटांनी सुरु होणार आहे. आणि ३ तारखेला सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी संपणार आहे. 

शुभ मुहूर्त

- जन्माष्टमीच्या दिवशी पूजेची वेळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत राहणार. 
- शुभ मुहूर्ता एकूण कालावधी ४५ मिनिटे राहिल.

Web Title: Janmashtami 2018: Date and time, shubh muhurt, significance and history of Krishna Janmashtami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.